2019ची लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखी, कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 09:14 AM2018-12-17T09:14:19+5:302018-12-17T09:17:58+5:30

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

amit shah addressing the workers politics bjp election of 2019 battle of panipat | 2019ची लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखी, कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच- अमित शाह

2019ची लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखी, कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच- अमित शाह

Next
ठळक मुद्दे जो काहीच मागत नाही, त्याल घरबसल्या सर्वकाही मिळतं, असं अमित शाह म्हणाले2019ची लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांवर लढवली जाणार आहे. 2019च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचं युग परिवर्तन होणार आहे.

नवी दिल्ली- भाजपाध्यक्षअमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. भाजपामध्ये जो काहीही मागतो त्याला काहीही मिळत नाही. परंतु जो काहीच मागत नाही, त्याल घरबसल्या सर्वकाही मिळतं, असं अमित शाह म्हणाले आहेत. 100 वर्षांपासून हा पक्ष असाच चालत आला आहे. 2019च्या लोकसभेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण आहे.

देशाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्यानं ती एखाद्या युद्धासारखी लढली जाईल, काही युद्ध असे असतात ते युग परिवर्तन घडवून आणतात. 2019च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचं युग परिवर्तन होणार आहे. या युद्धात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची नितांत आवश्यकता आहे. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढत भाजपाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच आहे, असंही शाह यांनी कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवलं आहे.

2019ची लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांवर लढवली जाणार आहे. जर पानिपतचं युद्ध आपण हरलो नसतो, तर इंग्रजांनीही आपल्यावर राज्य केलं नसतं. 2019ची निवडणूकही पानिपतच्या युद्धासारखी आहे. आज भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र झाले आहेत, परंतु आम्ही विरोधकांना घाबरत नाही, असंही ते म्हणाले आहेत.  पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यामुळे आपल्याला 200 वर्षं गुलामगिरीत घालवावी लागली. 2019ची निवडणूक जर भाजपानं जिंकली, तर 50 वर्षं खासदारापासून ते पंचायतीपर्यंत भाजपाचं शासन राहील, असंही शाह म्हणाले आहेत. 

Web Title: amit shah addressing the workers politics bjp election of 2019 battle of panipat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.