Amit Shah Breaking: अमित शहा एम्समध्ये दाखल; कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर थकवा जाणवू लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 10:39 AM2020-08-18T10:39:40+5:302020-08-18T11:08:53+5:30
Amit Shah Admitted Aiims : 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.
नवी दिल्ली : कोरोनावर मात करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घरी परतलेले असताना रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याचे समजते. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते.
एम्सने दिलेल्या माहितीनुसार अमित शहांना कोरोनानंतरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असून त्याचे कामही ते हॉस्पिटलमधून करत आहेत. शहा यांना थकवा आणि अंगदुखी होत होती.
एम्समध्ये डॉ. रणदीप गुलेरियां यांची टीम अमित शहांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. शहा यांना मध्यरात्री 2 वाजता हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी त्यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं ट्विट केलं.
ते म्हणाले,'' माझी कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या प्रकृतीसाठी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली व माझ्या कुटुंबीयांना धीर दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणखी काही दिवस मी होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे.''
त्यांनी पुढे म्हटले की,''कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता मला मदत करणाऱ्या आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या मेदांता हॉस्पिटलातील सर्व डॉक्टर्स व स्टाफचेही आभार.''
अन्य महत्वाच्या बातम्या...
कोरोना लस! भारताच्या जोरदार हालचाली; ५ कंपन्यांकडून मागविले कोटेशन
वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का
Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार
SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा
महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग
मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न
Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता
BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग
सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार