अमित शहांच्या हस्ते पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन, 'त्या' व्हायरल मेसेजमुळे नागरिकांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 02:17 PM2021-07-11T14:17:38+5:302021-07-11T14:28:16+5:30
Amit Shah Ahmedabad Visit: शहा वेजापूर परिसरातील नुकत्याच बांधण्यात आलेल्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करतील
अहमदाबाद: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते वेजापूर परिसरातील नुकत्याच बांधण्यात आलेल्या पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन केले. अमित शहांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या मेसेजमध्ये पोलिसांकडून वेजापूर परिसरातील नागरिकांना घराची दारं-खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
वेजापूर परिसरात हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या मेजेसमध्ये वेजापूर परिसरातील सोसाटींना पत्र लिहून घराची दारं-खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला.
सत्य काहीतरी वेगळेच
आमच्या पडताळणीत समोर आले की, पोलिसांनी वेजापूर परिसरातील स्वामीनारायण आणि स्वातीसह काही सोसाटींना पत्र लिहीले आहे. त्यात अमित शहांना झेड प्लस सिक्योरिटी असल्याचे सांगितले आहे. तसेच, शहा व्हीव्हीआयपी व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा आदेश जारी करण्यात आला. पण, या आदेशाचे पत्र संपूर्ण परिसरासाठी नसून, उद्घाटन होणाऱ्या हॉलच्या परिसरातील सोसायटींसाठीच आहे. तसेच, आदेशाचे पालन न केल्यास कारवाई होईल, असे या पत्रात नमुद केलेले नाही. मात्र, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत लोकांना दारं-खिडक्या बंद ठेवण्याची ताकीद देण्यात आली होती.