Port Blair renamed: अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखलं जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:51 PM2024-09-13T17:51:53+5:302024-09-13T17:58:15+5:30

Port Blair Renamed, Amit Shah: अमित शाह यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली माहिती

Amit Shah announced Andaman Nicobar Island capital Port Blair renamed as Sri Vijaya Puram | Port Blair renamed: अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखलं जाणार!

Port Blair renamed: अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखलं जाणार!

Port Blair Renamed, Amit Shah: केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजया पुरम असे केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली. ट्विटरवर एका पोस्टद्वारे ही माहिती देताना अमित शाह यांनी लिहिले की, देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजया पुरम' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 'श्री विजयपुरम' हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवेल.

अमित शाह यांनी पुढे लिहिले की, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाचे अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढ्यापर्यंत सर्व गोष्टींचे हे बेट साक्षीदार आहे.

Web Title: Amit Shah announced Andaman Nicobar Island capital Port Blair renamed as Sri Vijaya Puram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.