गांधी कुटुंबीय गोव्यात केवळ सुटी एन्जॉय करायला यायचे; अमित शाह यांचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 07:35 PM2022-01-30T19:35:56+5:302022-01-30T19:36:57+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं तसंच डोअर-टू-डोअर अभियानाची सुरूवात देखील केली.

amit shah arrives on one day goa visit ahead of assembly polls | गांधी कुटुंबीय गोव्यात केवळ सुटी एन्जॉय करायला यायचे; अमित शाह यांचा सणसणीत टोला

गांधी कुटुंबीय गोव्यात केवळ सुटी एन्जॉय करायला यायचे; अमित शाह यांचा सणसणीत टोला

Next

पणजी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं तसंच डोअर-टू-डोअर अभियानाची सुरूवात देखील केली. अमित शाह यांचं दाबोलिम विमानतळावर भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे उपस्थित होते. 

पोंडा विधानसभा मतदार संघात एका प्रचारसभेला संबोधित करताना अमित शाह यांनी भाजपानंच गोव्याचा विकास केला असल्याचा दावा केला. गांधी कुटुंबीयांसाठी गोवा तर फक्त सुटी एन्जॉय करण्याचं ठिकाण होतं, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केली. भाजपानं गोव्याचं बजेट ४३२ कोटींहून (२०१३-१४) वाढवून २,५६७ कोटी (वर्ष २०२१) इतकं केलं, असं अमित शाह म्हणाले. 

अमित शाह यांनी आज पोंडा येथील सभेला संबोधित करण्याआधी दक्षिण गोव्यातील बोरिम गावातील साईबाबा मंदिराचं दर्शन घेतलं. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार अमित शाह सांवोदेंम विधानसभा मतदार संघात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी वास्कोमध्ये एका जनसभेला संबोधित करणार आहेत. अमित शाह ज्या ज्या ठिकाणी सभा घेणार आहेत त्या सर्व ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचा काटेकोरपणे पालन केलं जाणार असल्याचंही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भाजपानं गोव्यात सर्वच म्हणजे ४० विधानसभा मतदार संघात उमेदवार जाहीर केले आहेत. 

Web Title: amit shah arrives on one day goa visit ahead of assembly polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.