रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:12 AM2024-10-10T11:12:14+5:302024-10-10T11:13:03+5:30

Ratan Tata: टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी टाटा यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. 

Amit Shah from Center to attend Ratan Tata's funeral; PM Narendra Modi on foreign tour | रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर

रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर

जगविख्यात उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी वरळीतील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांचे पार्थिव सामान्य नागरिकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी एनसीपीएमध्ये आणण्यात आले आहे. शासकीय इतमामात टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रातून गृहमंत्री अमित शाह हे येणार असल्याचे वृत्त येत आहे. भारत सरकारकडून शाह हे रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करतील असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लाओस दौऱ्यावर निघाले आहेत. यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाहीत. मोदी यांनी रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांचे फोनवरून सांत्वन केले आहे. 

रतन टाटा यांचे पार्थिव नरीमन ग्राऊंडच्या एनसीपीए ग्राऊंडवर आणण्यात आले आहे. टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी टाटा यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. 

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

भारताचे ज्येष्ठ उद्योगपती टाटा समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे निधन झाल्याची रात्री बातमी आली. ही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. टाटा यांच्या निधनाची बातमी रात्री उशीरा आली.  टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Amit Shah from Center to attend Ratan Tata's funeral; PM Narendra Modi on foreign tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.