अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 04:06 PM2024-06-12T16:06:16+5:302024-06-12T16:09:38+5:30

Amit Shah : सध्या सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अमित शाह एका महिला नेत्यावर संतापल्याचे दिसत आहेत.

amit shah get angry he warned the tamilisai soundararajan in front of everyone | अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं

अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं

Amit Shah ( Marathi News ) : आज आंध्र प्रदेशमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा झाला. टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. दरम्यान, या सोहळ्यातील अमित शाह यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अमित शाह माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्यावर संतापल्याचे दिसत आहेत. पण, याबाबत अद्याप भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Rahul Gandhi : "मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही"; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...

तमिलिसाई सौंदरराजन यांनी भाजपच्या तिकिटावर तामिळनाडूतून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. शाह आणि त्यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसापासून तमिलिसाई सौंदरराजन आणि तामिळनाडूचे राज्यप्रमुख अन्नामलाई यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे, यादरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अण्णामलई यांना कोईम्बतूरमधून तर सौंदरराजन यांना चेन्नई दक्षिण मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. सुमारे २० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सौंदरराजन स्टेजवर बसलेल्या शाह यांच्याशी बोलत असल्याचे आणि पुढे सरकल्याचे दिसत आहे. यानंतर शाह त्यांना परत बोलावून काही सल्ला देताना दिसत आहेत.

भाजप राज्य सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष कार्तिक गोपीनाथ यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'हे अमित शाहजींकडून तमिलिसाई अक्का यांना कडक चेतावणी असल्यासारखे वाटते, पण सार्वजनिक इशारा देण्याचे कारण काय असू शकते? 

यावेळी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि नितीन गडकरी हे देखील शाह यांच्या जवळ व्यासपीठावर दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अण्णामलाई आणि सौंदरराजन यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

Web Title: amit shah get angry he warned the tamilisai soundararajan in front of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.