मोदींपाठोपाठ अमित शाहांचाही FBवर बोलबाला ! फॅन फॉलोविंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मजल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 04:58 PM2017-08-02T16:58:00+5:302017-08-02T17:44:01+5:30

विरोधकांच्या बालेकिल्ल्यात निवडणुकींमध्ये खिंडार पाडून आपल्या पक्षाचा झेंडा रोवणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आता नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे.  फेसबुकवर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येनं एक कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे.

Amit Shah has dominated the FB after Modi! The second position in the fan follow-up | मोदींपाठोपाठ अमित शाहांचाही FBवर बोलबाला ! फॅन फॉलोविंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मजल

मोदींपाठोपाठ अमित शाहांचाही FBवर बोलबाला ! फॅन फॉलोविंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मजल

Next

नवी दिल्ली, दि. 2 -  विरोधकांच्या बालेकिल्ल्यात निवडणुकींमध्ये खिंडार पाडून आपल्या पक्षाचा झेंडा रोवणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आता नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे.  फेसबुकवर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येनं एक कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे. यासंबंधी भाजपाने ट्विट करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना फेसबुकवर सर्वाधिक फॉलो केले जाते. या आकड्यांनुसार, अमित शाह फेसबुकवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे देशातील दुसरे राजकीय नेते आहेत. 


तर यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यांचे फेसबुकवर सर्वाधिक म्हणजे 4 कोटी 26 लाख फॉलोअर्स आहेत.  तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे फेसबुकवर 1 कोटी 20 हजार फॉलोअर्स आहेत. कोटींच्या घरात फेसबुकवरील फॉलोअर्संचा आकडा पोहोचल्यानंतर अमित शाह यांनी फॉलोअर्सचे आभार मानले. तुम्हा सर्वांचे प्रेम तसेच सहकार्यासाठी मनापासून आभार, असे ट्विट करुन अमित शाह यांनी केले आहे. भाजपाचे अध्यक्ष ट्विटवरदेखील प्रचंड सक्रीय आहेत. ट्विटरवर त्यांचे जवळपास 58 लाख 89 हजार फॉलोअर्स आहेत. 


अमित शाह एक सक्रीय राजकारणी असून सध्या ते मिशन 2019 साठी 100 दिवसांचा राष्ट्रव्यापी दौरा करत आहेत. ज्या ठिकाणी भाजपा अपेक्षेनुसार अद्यापही कमकुवत आहे, अशा  राज्यांत व क्षेत्रांवर अमित शाह या दौ-यात लक्ष्य केंद्रीत करत आहेत. 



Web Title: Amit Shah has dominated the FB after Modi! The second position in the fan follow-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.