"आयुष्मान CAPF योजनेचा शुभारंभ, 10 लाख जवानांना होणार फायदा"; अमित शहांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 10:58 AM2021-01-24T10:58:59+5:302021-01-24T11:00:54+5:30
Ayushman CAPF Healthcare Scheme : अमित शहा यांनी गुवाहाटीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी (CAPF) आयुष्मान सीएपीएफ योजनेची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी (CAPF) आयुष्मान सीएपीएफ योजनेची (Ayushman CAPF Healthcare Scheme) घोषणा केली आहे. अमित शहा सध्या आसामच्या दौऱ्यावर असून शनिवारी गुवाहाटी येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. आयुष्मान सीएपीएफ योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून केंद्रीय आरोग्य विमा कार्यक्रमांचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 10 लाख केंद्रीय सैन्य दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा होणार आहे.
आयुष्मान सीएपीएफ योजनेअंतर्गत 10 लाख केंद्रीय सैन्य दलाच्या जवानांना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या 50 लाख कुटुंबीयांनाही देशातील 24 हजार रुग्णालयांमध्ये उपचार मिळू शकणार आहेत तसेच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. "आयुष्मान सीएपीएफ योजना सुरू करण्यासाठी सीएपीएफच्या सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा आजचा चांगला दिवस आहे. 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा' अशी घोषणा देऊन त्यांनी तरुणांमध्ये जोश भरला होता" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
Under this scheme around 10 lakh CAPF jawans & officers, and around 50 lakh relatives & family members of them will be able to avail medical benefits at any of the 24,000 hospitals across the country: Union Home Minister Amit Shah in Guwahati, Assam https://t.co/vV4yCYTlFP
— ANI (@ANI) January 23, 2021
"सीएपीएफचे जवान कोरोनाविरूद्धच्या लढाईत आघाडीवर उभे होते. याच दरम्यान काही जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला. अनेकांनी आपला जीव देखील गमावला. या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या सर्व जवानांचं अभिनंदन करतो. या योजनेतून सीएपीएफच्या जवानांना उपचारासाठी हॉस्पिटल्समध्ये फक्त कार्ड स्वॅप करावं लागेल" असं देखील शहा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सैन्याला 1 लाख बुलेट प्रूफ जॅकेट (Bullet Proof Jackets) दिले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्याकडे भारतात तयार करण्यात आलेली बुलेट प्रूफ जॅकेट्स सोपवली.
भाजपा नेत्याचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोलhttps://t.co/c4PxuFuTjl#MamataBanerjee#AnilVij#BJP#NarendraModipic.twitter.com/o22TLEE3mp
— Lokmat (@MiLOKMAT) January 24, 2021
अरे व्वा! सैन्याला मिळाले 1 लाख 'मेक इन इंडिया' बुलेट प्रूफ जॅकेट; वेळेआधीच झाली डिलिव्हरी
विशेष म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट्स हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असून मेक इन इंडिया (Make in India) या योजनेअंतर्गत याची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान श्रीपाद नाईक यांनी आम्ही लष्कराच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं होतं. बुलेट प्रूफ जॅकेट्सची वेळेआधीच डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी आपल्या सैनिकांची सुरक्षा ही सर्वप्रथम आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारी शस्र आणि सुरक्षा उपकरणं उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे" असं श्रीपाद नाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.
"RSSमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत"https://t.co/ytuiYecdid#Congress#RahulGandhi#RSS#NarendraModi#BJP#TamilNadupic.twitter.com/7sDZxI8FZK
— Lokmat (@MiLOKMAT) January 24, 2021