अमित शहा मध्यरात्रीच मुंबईत; सरसंघचालकांची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:24 AM2018-11-02T09:24:02+5:302018-11-02T11:33:49+5:30
भाईंदरच्या रामभाऊ म्हाऴगी प्रबोधिनीमध्ये संघाच्या बैठका सुरु आहेत.
मुंबई : देशातील पाच राज्यांमधील निवडणुका आणि राम मंदिर विवादाच्या पार्श्वभुमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी मध्यरात्रीच अचानक मुंबईत दाखल झाले. यातच शिवसेनेनेही तातडीची बैठक ठेवल्याने मुंबईतील राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा रंगली आहे.
भाईंदरच्या रामभाऊ म्हाऴगी प्रबोधिनीमध्ये संघाच्या बैठका सुरु आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे सरसंघचालक मोहन भागवत म्हाऴगी प्रबोधिनीमध्ये आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा अचानक मध्यरात्री मुंबईत दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. म्हाऴगी प्रबोधिनीमध्ये आज शहा आणि भागवत यांच्यामध्ये खलबते होणार आहेत. यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि राम मंदिर प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Mumbai: BJP President Amit Shah has met several RSS leaders, including its chief Mohan Bhagwat, on the sidelines of RSS executive meet in Bhayandar this morning. #Maharashtra
— ANI (@ANI) November 2, 2018
विधानसभा निवडणुकांत राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये काल भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार होते. मात्र, अचानक ही यादी रद्द करण्यात आली. यामध्ये विद्यमान 40 आमदारांना डच्चू देण्यात येणार असल्याचे समजते. भाजपशासित राज्य हातचे जाऊ नये यासाठी ही उमेदवार यादी आज जाहीर केली जाणार आहे. या पार्श्वभुमीवर शहा-भागवत यांच्यातील बराचवेळ चाललेली चर्चा सूचक इशारा करत आहे.