2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:02 PM2024-05-13T17:02:46+5:302024-05-13T17:04:29+5:30

2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून लागला नाही, तेच अमित शाह यांनी 2029 च्या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Amit Shah on PM Modi: Who will be BJP's PM candidate in 2029? Amit Shah spoke clearly | 2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...

2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. एकीकडे भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात 2024 मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापनेचा दावा करत आहे. तर, दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत, म्हणजेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 400 पारचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असून, त्यांच्याच चेहऱ्यावरच ही निवडणूक लढवली जात आहे. पण, आगामी काळात भाजपचे नेतृत्व कोण करेल, हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. आता अमित शाह यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

हिंदी वृत्तवाहिनी एबीपीशी बोलताना अमित शाह यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार, याबाबत माहिती दिली. शाह म्हणाले की, "नरेंद्र मोदी 2029 चा कार्यकाळ पूर्ण करतील आणि 2029 नंतरही भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व नरेंद्र मोदीच करतील." याचाच अर्थ आगामी निवडणुकाही भाजप पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्टझाले आहे.

सात टप्प्यात निवडणुका, 4 जूनला निकाल 

18 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत चार टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून, 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात आणि 1 जून रोजी सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर, लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे.

Web Title: Amit Shah on PM Modi: Who will be BJP's PM candidate in 2029? Amit Shah spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.