Census 2021 : अमित शाहांनी दिला नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव; आधार, पासपोर्ट, DLचं करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:51 PM2019-09-23T13:51:32+5:302019-09-23T13:52:58+5:30
Digital Census in 2021 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव दिला आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव दिला आहे. गृहमंत्र्यांच्या मते, या ओळखपत्रात पासपोर्ट, आधार आणि व्होटर आयडी कार्ड यांचा अंतर्भाव असणार आहे. अमित शाह यांनी देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची शिफारस करत 2021ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार असल्याचं सांगितलं आहे.
ते म्हणाले, आधार, पासपोर्ट, बँक खाते, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड यांसारख्या सर्व सुविधा एकाच कार्डात असणं गरजेचं आहे. त्यासाठीही अमित शाहांनी हा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, एक अशी व्यवस्था असली पाहिजे, ज्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ऑटोमेटिक पद्धतीनं त्याची माहिती लोकसंख्येच्या डेटामध्ये अपडेट होईल, आम्हाला एक असं कार्ड आणायचं आहे, जे सर्व गरजा जसे की, आधार कार्ड, पासपोर्ट, बँक अकाऊंट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी पूर्ण करेल.
Union Home Minister Amit Shah: A digital application, an app will be used for population census in the year 2021. It will be transformation from paper to digital census. pic.twitter.com/Xn992vekGz
— ANI (@ANI) September 23, 2019
अशी होणार जनगणना
जनगणना हे काही कंटाळवाणं काम नाही. त्यामुळे सरकारला योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत मिळते. राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर(NPR)च्या अनेक मुद्दे सोडवण्यासाठी सरकार मदत करते. हे देशातल्या इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. जनगणनेचं काम अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. देशात आता आधारच्या अनिवार्यतेवर चर्चा सुरू आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्र्यांनी नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव ठेवला आहे.