अमित शाह राज्यसभेवर, आनंदीबेन उपराष्ट्रपती?

By admin | Published: April 1, 2017 01:22 AM2017-04-01T01:22:33+5:302017-04-01T01:22:33+5:30

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हे दोघे येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदासाठीची

Amit Shah Rajya Sabha, Anandiben Vice President? | अमित शाह राज्यसभेवर, आनंदीबेन उपराष्ट्रपती?

अमित शाह राज्यसभेवर, आनंदीबेन उपराष्ट्रपती?

Next

हरीश गुप्ता / नवी दिल्ली
भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हे दोघे येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक होताच आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत गुजरातेतील आमदार व खासदार मतदार असल्यामुळे ते पद सध्या सोडणार नाहीत.
आमदारकी सोडण्याची दोघांचीही स्वत:ची कारणे आहेत. अमित शाह यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या आॅगस्टमध्ये तीन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ते राज्यसभेचे सदस्य होणे पसंत करतील. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (भाजपा), केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दिलीपभाई पंड्या हे गुजरातेतून खासदारपदाची सहा वर्षांची मुदत पूर्ण करीत आहेत. काँग्रेसचे अहमद पटेल यांचीही राज्यसभेतील मुदत पूर्ण होत आहे. राज्य विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ पाहता भाजपा आपल्या दोन्ही जागा कायम राखील व काँग्रेसला एक जागा सहजपणे ठेवता येईल. शाह यांचे राज्यसभेत येणे हा आधीच ठरलेला निर्णय आहे. एका गटाचे म्हणणे असे आहे की जी दुसऱ्या जागेवर आनंदीबेन पटेल यांना राज्यसभेवर पाठवून मंत्री केले जाईल. गोव्याचे मुख्यमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर यांच्या रिकाम्या होणाऱ्या जागेवर स्मृती इराणी यांची वर्णी लागू शकते. सध्या पर्रीकर हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले आहेत. परंतु राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे ती आनंदीबेन पटेल यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली जाऊ शकते या चर्चेने.
भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाचा आपला स्वत:चा उमेदवार निवडून आणण्याइतके स्पष्ट बहुमत आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय नागरी विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत, माजी सरन्यायाधीस व केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम व इतरांची नावे चर्चेत आहेत.

Web Title: Amit Shah Rajya Sabha, Anandiben Vice President?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.