“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 06:24 AM2024-05-12T06:24:59+5:302024-05-12T06:25:32+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

amit shah said narendra modi will become pm for the third time and will also complete the term there is no age requirement for the post of pm | “मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही

“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होणार असल्याने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात मध्यंतरी निवृत्त होत आहेत, या चर्चांना पूर्णविराम देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी स्पष्ट केले की, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर मुद्दा उपस्थित केल्यानंतर आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोदींच्या ७५ व्या वर्षी निवृत्त होण्याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर अमित शाह यांनी ही टिप्पणी केली. तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता.


 

Web Title: amit shah said narendra modi will become pm for the third time and will also complete the term there is no age requirement for the post of pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.