"काँग्रेसने अर्थव्यवस्थेचे नुकसान केले, मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणले", अमित शाहांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 07:59 PM2022-09-26T19:59:37+5:302022-09-26T20:03:27+5:30
amit shah : अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्य सेवा जागतिक दर्जाच्या बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत.
अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीगुजरातमध्ये विरोधी पक्ष काँग्रेसवर सडकून टीका केली. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केल्याचा आरोप अमित शाह यांनी काँग्रेसवर केला. ते म्हणाले, 'भारत ही जगातील 11वी मोठी अर्थव्यवस्था होती. काँग्रेसने बाराव्या क्रमांकावर आणले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनीच पुन्हा 11 व्या स्थानावर आणले होते. तसेच, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ते पाचव्या क्रमांकावर आणले."
यासोबतच अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्य सेवा जागतिक दर्जाच्या बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत. ईएसआयसी (ESIC) योजना अधिक उपयुक्त करून त्यांनी देशभरातील कामगारांना सामाजिक सुरक्षा दिली आहे. साणंद येथे 350 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाची पायाभरणी केली. याचा फायदा 12 लाख कामगार आणि परिसरातील रहिवाशांना होणार आहे.
Gujarat | India was 11th largest economy in the world. Congress had brought it down to 12th. It was Atal Bihari Vajpayee who had raised it again to the 11th position. After Narendra Modi became the PM, he brought it to the 5th position: Home Minister Amit Shah pic.twitter.com/9yy9lewei0
— ANI (@ANI) September 26, 2022
दरम्यान, भाजपच्या गुजरात युनिटचे प्रमुख सीआर पाटील यांनी सोमवारी सांगितले की, यावेळच्या निवडणुका येत्या नोव्हेंबरपर्यंत संपतील. याठिकाणी गेल्या वेळेसारखे होणार नाही. गेल्या वेळी निवडणूक डिसेंबरपर्यंत चालली होती. सीआर पाटील यांनी मात्र हा त्यांचा अंदाज असल्याचे सांगितले. ते कोणत्याही अधिकाऱ्याशी बोलले नाहीत.
सीआर पाटील यांनी आनंद येथे हे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते दीपक बाबरिया म्हणाले, सीआर पाटील यांच्या वक्तव्यावरून केंद्र सरकार केवळ कमकुवतच नाही, तर निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर नियंत्रण आणल्याचे दिसून येते.
आमचा जगातील सर्वात मोठा पक्ष - जेपी नड्डा
दुसरीकडे, केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आमचा एकमेव असा पक्ष आहे, जो जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचा भारतातील एकमेव वैचारिक आधार असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. एकता, विविधतेवर विश्वास ठेवणारा आणि अटल राष्ट्रीय बांधिलकी असलेल्या पक्षात आम्ही आहोत.