शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 11, 2021 08:22 PM2021-02-11T20:22:02+5:302021-02-11T20:23:02+5:30

शाह म्हणाले, ''आम्ही CAA घेऊन आलो, मधेच कोरोना आला. ममता दीदी म्हणत आहेत, की हे खोटे आश्वासन आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. (Citizen Amendment Act)

Amit Shah says we will start granting citizenship to refugees under CAA after Corona vaccination ends | शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना लसिकरण कार्यक्रम (Corona vaccination) संपल्यानंतर, सीएए (CAA) अंतर्गत शरणार्थ्यांना नागरिकता द्यायला सुरुवात केली जाईल, असे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज स्पष्ट केले. ''सीएएच्या मुद्यावर विरोधक अल्पसंख्यकांची दिशाभूल करत आहेत. भारतीय अल्पसंख्यकांच्या नागरिकत्वावर याचा काहीही परिणाम होणार नाही,'' असे शाह यांनी म्हटले आहे. ते मतुआ समुदाय बहुल असलेल्या ठाकुरनगर भागात एका सभेला संबोधित करत होते. (Amit Shah says we will start granting citizenship to refugees under CAA after Corona vaccination ends)

शाह म्हणाले, ''आम्ही CAA घेऊन आलो, मधेच कोरोना आला. ममता दीदी (Mamata Banerjee) म्हणत आहेत, की हे खोटे आश्वासन आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. लसिकरणाचा कार्यक्रम संपताच आणि कोरोनापासून मुक्ती मिळताच, भाजप आपल्या सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करेल.''

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

आता ममता बॅनर्जी सीएएला लागू करण्याला विरोध करण्याच्या स्थितीत नसतील. कारण विधानसभा निवडणुकीनंतर त्या मुंख्यमंत्री नसतील. मोदी सरकारने 2018 मध्येच नवा नागरिकता कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते आणि 2019 मध्ये भाजप सत्तेवर येताच, हे आश्वासन पूर्ण करण्यात आले, असेही शाह म्हणाले.

...तेव्हा ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम'
यापूर्वी अमित शाह यांनी कूचबिहार येथील जाहीर सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

Web Title: Amit Shah says we will start granting citizenship to refugees under CAA after Corona vaccination ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.