विधानसभा निवडणुकांपर्यंत अमित शहाच राहणार अध्यक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:26 AM2019-06-14T07:26:15+5:302019-06-14T07:26:31+5:30
तीन राज्यांतील निवडणुकांपर्यंत अध्यक्ष राहण्यासाठी नेत्यांचा आग्रह
नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच भाजपचे अध्यक्षपद राहणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्यांनी या ३ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत अध्यक्षपदी राहावे, असा नेत्यांचा आग्रह आहे.
अमित शहा यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पातळीवर नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सर्वच नेत्यांनी अमित शहा यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पक्षाध्यक्षपदी राहावे, असा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. स्वत: अमित शहा ते मान्य करतील, असा अंदाज आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशांतून आल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या तीन राज्यांत सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे.
नव्या सदस्यांची नोंदणी
च्या बैठकीत पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची जबाबदारी बहुधा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे देण्यात येणार आहे. भाजपच्या सदस्यांची संख्या ११ कोटी असून, सव्वादोन कोटी नवे सदस्य नोंदवण्याचे लक्ष्य आहे.