भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांची अमित शहांकडून कानउघडणी

By admin | Published: October 18, 2015 12:21 PM2015-10-18T12:21:12+5:302015-10-18T12:21:22+5:30

बीफ बंदी आणि दादरीतील हत्याप्रकरणावरुन भाजपा नेत्यांकडून वादग्रस्त विधानांची मालिका सुरु असतानाच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी वाचाळवीर नेत्यांची कानउघडणी केली आहे.

Amit Shahan from BJP's bookmakers | भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांची अमित शहांकडून कानउघडणी

भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांची अमित शहांकडून कानउघडणी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - बीफ बंदी आणि दादरीतील हत्याप्रकरणावरुन भाजपा नेत्यांकडून वादग्रस्त विधानांची मालिका सुरु असतानाच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी वाचाळवीर नेत्यांची कानउघडणी केली आहे. अमित शहा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री महेश शर्मा, आमदार संगीत सोम आणि भाजपा खासदार साक्षी महाराज यांना समन्स बजावत जीभेवर लगाम लावण्याची तंबीच दिली आहे. 

दादरी हत्याप्रकरण आणि बीफ बंदी यावरुन भाजपा नेत्यांमध्ये वादग्रस्त विधान करण्याची चढाओढच सुरु आहे. नेत्यांच्या बेताल विधानांमुळे मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाचाळवीर नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याने पक्षाध्यक्ष अमित शहांनी या नेत्यांना समन्स बजावले आहे. या नेत्यांना पक्षकार्यालयात बोलवण्यात आल्याचे समजते. संगीत सोम  यांनी अमित शहांची भेट घेतली असून पक्षाच्या कामासंबंधी अमित शहांसोबत चर्चा करण्यासाठी आलो आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.  

 

Web Title: Amit Shahan from BJP's bookmakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.