दलालीवरुन अमित शहांचा राहुल गांधींवर सर्जिकल स्ट्राइक
By admin | Published: October 7, 2016 12:30 PM2016-10-07T12:30:00+5:302016-10-07T13:48:23+5:30
दलाली हा शब्द काँग्रेसला लागू पडतो. तो शब्द त्यांनी आपल्यापर्यंतच ठेवावा. आम्हाला तो शब्द जोडू नये.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - दलाली हा शब्द काँग्रेसला लागू पडतो. तो शब्द त्यांनी आपल्यापर्यंतच ठेवावा. आम्हाला तो शब्द जोडू नये अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला. भाजप सरकार जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे असे विधान राहुल यांनी केले होते.
अमित शहा यांनी राहुल यांच्या विधानाचा निषेध केला. राहुल यांनी सैन्याचा अपमान केलायं असे त्यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे मागणा-या अरविंद केजरीवालांवरही त्यांनी तोफ डागली. पाकिस्तानातील परिस्थितीचे विश्लेषण केले असते तर पुरावे मागण्याची वेळ पडलीच नसती.
सर्जिकल स्ट्राईक्सनंतर पाकिस्तानात जो गोंधळ आहे तो पुरेसा पुरावा आहे. स्ट्राईक्स झाले नाहीत मग पाकिस्तानने विशेष अधिवेशन का बोलावले ?, पाकिस्तानी पंतप्रधान इस्लामाबादमध्येच का थांबून आहेत ? हे चित्र परिस्थिती स्पष्ट करायला पुरेसे आहे असे अमित शहा यांनी सांगितले.
स्ट्राईक्सचे आम्ही राजकारण केले नाही असेही शहा यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण देश, सरकार आणि भाजप लष्कराच्या पाठिशी आहे. आमचा लष्कराच्या गोळीवर विश्वास आहे. राजकीय विधानांवर नाही असे अमित शहा यांनी सांगितले. काही लोकांनी सैन्याचाच नव्हे तर, देशासाठी शहीद झालेल्यांचाही अपमान केला असे शहा यांनी सांगितले.
सरकारने स्ट्राईक्सचे राजकारण होऊ नये याची काळजी घेतली. पत्रकार परिषदही डीजीएमओंनी घेतली होती असे अमित शहा यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर प्रसारमाध्यांनी बजावलेल्या भूमिकेचेही अमित शहा यांनी कौतुक केले.
काय म्हटले अमित शहांनी पत्रकारपरिषदेत
पाकिस्तानातील परिस्थितीचा विश्लेषण केलं असत तर तुम्हाला पुरावे मागण्याची गरज पडली नसती - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
भाजप आणि देशाला सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईक्सचा अभिमान आहे - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
आमच सरकार दृढ राजकीय इच्छाशक्तीसह सैन्याच्या मागे ठामपणे उभे आहे - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
मौत के सौदागर या शब्दप्रयोगानंतर गुजरातमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
राहुल गांधींच्या वक्तव्यातून त्यांची मानसिकता दिसते, त्यांनी जवानांचा अपमान केला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
दलाली शब्द काँग्रेसमध्ये भिनलाय - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
राहुल गांधींचा शब्दप्रयोग हा सैन्याच्या शौर्यचा अपमान - - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
अमित शहांची सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे मागणा-या अरविंद केजरीवालांवर टीका.
सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल शंका घेऊन, काहीजणांनी शहीदांचा, सैन्याचा अपमान केला- अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल शंका निर्माण केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी चांगले काम करुन शंका दूर केली - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी चांगले काम केले, त्यामुळे सैन्याचे मनोधैर्य वाढले असून, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.