बिहारमधील पराभवाचे खापर अमित शहांवर, पक्षाध्यक्षपदावरुन गच्छंती ?

By admin | Published: November 9, 2015 12:41 PM2015-11-09T12:41:18+5:302015-11-09T12:47:39+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने अमित शहा यांची पक्षाध्यक्षपदावरुन गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे.

Amit Shah's defeat in Bihar, President of the party? | बिहारमधील पराभवाचे खापर अमित शहांवर, पक्षाध्यक्षपदावरुन गच्छंती ?

बिहारमधील पराभवाचे खापर अमित शहांवर, पक्षाध्यक्षपदावरुन गच्छंती ?

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ९ - बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने अमित शहा यांची पक्षाध्यक्षपदावरुन गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. जानेवारीमध्ये अमित शहा यांची पक्षाध्यक्षपदाची टर्म संपणार असून यानंतर अमित शहा यांना पुन्हा पक्षाध्यक्षपदाची संधी दिली जाणार नाही अशी चर्चा भाजपाच्या गोटात रंगली आहे. 

बिहारमधील भाजपा खासदारांना पक्षाच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खासदार चंदन मित्रा यांनी भाजपाचे अति आक्रमक प्रचारतंत्र नाकारल्याचे म्हटले आहे. तर खासदार आर के सिंह यांनी पक्षात पैसे घेऊन तिकीट वाटप होत असल्याचा जाहीर आरोप केला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचारतंत्रावर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केले आहेत. विजयासाठी जसे नेतृत्वाला जबाबदार धरले जाते तसेच पराभवाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले होते. भाजपाच्या खासदारांनी पक्षनेतृत्वावर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केले असतानाच एनडीएतील मित्रपक्षही पक्षनेतृत्वावर नाराज आहे. बिहारमध्ये नितीशकुमार हिरो ठरल्याचे सांगत शिवसेनेनेही भाजपाच्या पराभवावर मीठ चोळले होते. 

पक्षात अमित शहांच्या कार्यपद्धतीवर दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत असून पराभवासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणसंदर्भातील विधानही कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते.नरेंद्र मोदींचा करिष्माही बिहारमध्ये भाजपाला तारु शकला नाही. अशा स्थितीत मोदी किंवा मोहन भागवत यांना पराभवासाठी जबाबदार ठरवता येणार नाही. त्यामुळे अमित शहा यांच्यावरच पराभवाची जबाबदारी टाकली जाईल व त्यांना पक्षाध्यक्षपदाची दुस-यांदा संधी मिळणार नाही असे समजते. 

दरम्यान राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विधानसभा निवडणुकीतील पराभव व पक्षाध्यक्षपद यांचे संबंध जोडणे अनुचित असल्याचे म्हटले होते. मी अध्यक्षपदी असतानाही भाजपाचा काही विधानसभांमध्ये पराभव झाला तर काही ठिकाणी पक्षाला घवघवीत यश मिळाले होते अशी आठवण सांगत त्यांनी अमित शहांचे समर्थन केले होते. 

Web Title: Amit Shah's defeat in Bihar, President of the party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.