अमित शहा यांचा आंध्र प्रदेशच्या कारभारात हस्तक्षेप, चंद्राबाबूंचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:03 AM2018-05-29T05:03:30+5:302018-05-29T05:03:30+5:30
ज्याच्याशी देणे-घेणे नाही, अशा गोष्टींविषयी भाष्य करून भाजपाध्यक्ष अमित शहा हे आंध्र प्रदेशच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा त्या राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला.
अमरावती : ज्याच्याशी देणे-घेणे नाही, अशा गोष्टींविषयी भाष्य करून भाजपाध्यक्ष अमित शहा हे आंध्र प्रदेशच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा त्या राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला.
नायडू म्हणाले की, शहा खासदार असूनही भाष्य करतात आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती व पोलावरम सिंचन प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देणे व आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणे या विषयांवर. अमरावती व पोलावरम येथील कामांबद्दल आंध्र प्रदेश सरकारने केंद्राला खोटी युटिलायझेशन प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. हे विचारण्याचा शहा यांना काय अधिकार आहे? याबाबत त्या खात्याचे केंद्रीय मंत्री वा पंतप्रधानांना माहिती सांगू शकतात.