अमित शहा यांची साक्ष होणार १८ सप्टेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:21 AM2017-09-13T01:21:10+5:302017-09-13T01:21:10+5:30
गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीच्या संदर्भात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात साक्ष देण्यासाठी यावे यासाठी समन्सच निघाले आहे.
अहमदाबाद : गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीच्या संदर्भात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात साक्ष देण्यासाठी यावे यासाठी समन्सच निघाले आहे.
नरोदा पाटिया येथील दंगलीच्या प्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना याआधी न्यायालयाने दोषी शिक्षा सुनावली. आता नरोदा गावात झालेल्या दंगलीतील सहभागाबद्दल विशेष न्यायालयात खटला सुरू असून, बचाव साक्षीदार म्हणून अमित शहा यांचे नाव आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, माया कोडनानी मंत्री होत्या.
नरोदा येथे जेव्हा दंगल झाली, तेव्हा आपण अमित शहा यांच्यासमवेत रुग्णालयात गेलो होतो, त्यामुळे आपला दंगलीत सहभाग नाही, असा दावा माया कोडनानी यांनी न्यायालयात केला आहे. (वृत्तसंस्था)
मुदतवाढ नाही
न्यायालयाने १८ सप्टेंबर ही तारीख नक्की केली. तसेच अमित शहा यांच्या घरी समन्स द्यावे वा लावण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले आहे. आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळीच स्पष्ट केले होते.