सिनेमाच्या शूटिंगवेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 11:42 AM2018-03-13T11:42:47+5:302018-03-13T13:30:55+5:30

बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 

amitabh bacchan fall a sick on the set of his upcoming movie in jodhpur | सिनेमाच्या शूटिंगवेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड

सिनेमाच्या शूटिंगवेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड

Next

मुंबई - बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जोधपूरमध्ये 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक जोधपूरला जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन एका चार्ट्ड विमानानं मुंबईमध्ये परतणार आहेत. काही दिवसांपूर्वीचे कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली होती. प्रकृती ठीक नसल्याची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे दिली होती.  पहाटे 5 वाजता शूटिंग संपवून बिग-बी हॉटेलवर आले आणि प्रकृती ठीक वाटत नसल्याचं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं. शिवाय, डॉक्टर प्रकृतीची तपासणी करण्यासाठी येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. बिग बींच्या या ब्लॉगमुळे त्यांच्या चाहत्यांची काळजी वाढली. 

अमिताभ बच्चन यांनी काय लिहिलंय ब्लॉगमध्ये ?
''पहाटेचे 5 वाजलेत, एका नवीन पहाटेची सुरुवात. काही लोक जगण्यासाठी काम आणि मेहनत करत आहेत.  अडचणींचा सामना केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. बराच संघर्ष, निराशा आणि वेदना होतील. तेव्हाच आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होतील. कधी होतील आणि कधी होणार नाहीत. जेव्हा आपली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तेव्हा आपण अधिक चांगलं करण्याची गरज आहे.''

Web Title: amitabh bacchan fall a sick on the set of his upcoming movie in jodhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.