शेतकऱ्यांना बिग बींनी दिला मदतीचा हात, 4 कोटींचं फेडलं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 01:17 PM2018-11-21T13:17:18+5:302018-11-21T13:44:19+5:30
बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
लखनौ - बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बिग बींनी विदर्भातील 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील 1398 शेतकऱ्यांचे तब्बल 4.05 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर याबाबतची माहिती दिली आहे.
'शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व शेतकऱ्यांना मुंबईला आणणे शक्य नाही. त्यासाठी 70 शेतकऱ्यांना मुंबईला आणण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी रेल्वेची एक बोगी बुक केली आहे. 26 नोव्हेंबरला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल' असं बिग बींनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधील ज्या 1398 शेतकऱ्यांचे बँक कर्ज फेडण्याचा विचार केला होता. तो पूर्ण केला आहे. बँकांनी त्यांच्या नावाने ओटीएस प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा खूप आनंद झाल्याचंही त्यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांनी याआधी 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे.