स्थलांतरित मजुरांसाठी 'खुशखबर', अमिताभ बच्चन यांनी केली चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 05:27 PM2020-06-10T17:27:22+5:302020-06-10T17:31:25+5:30

यापूर्वी अभिनेता सोनू सूद यांनीही अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना विशेष विमानाने त्यांच्या घरी सोडले आहे. 

amitabh bachchan helping up migrants arranged six charted fights to reach them at home | स्थलांतरित मजुरांसाठी 'खुशखबर', अमिताभ बच्चन यांनी केली चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था!

स्थलांतरित मजुरांसाठी 'खुशखबर', अमिताभ बच्चन यांनी केली चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था!

Next
ठळक मुद्देमुंबईत अडकलेल्या उत्‍तर प्रदेशातील कामगारांना त्यांच्या घरी जाता यावे, यासाठी त्यांनी 6 स्‍पेशल चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था केली आहे. 4 फ्लाइट्स आज 10 जून आणि 2 फ्लाइट्स 11 जूनला रवाणा होणार आहेत.29 मेरोजी 10 बसेसदेखील पाठवल्या होत्या

लखनौ/मुंबई : बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन स्थालांतरित मजुरांना सातत्याने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाउन काळात आपल्या कुटुंबापासून दूर अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करून बिग बींनी त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली. यानंतर आता, मुंबईत अडकलेल्या उत्‍तर प्रदेशातील कामगारांना त्यांच्या घरी जाता यावे, यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी 6 स्‍पेशल चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था केली आहे. 

यापूर्वी अभिनेता सोनू सूद यांनीही अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना विशेष विमानाने त्यांच्या घरी सोडले आहे. 

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

दोन दिवसांत पोहोचणार सर्व विमाने - 
अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडचे (ABCL) व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांनी सांगितले, की तांत्रिक कारणांमुळे रेल्वे रद्द झाल्यास स्थलांतरित कामगार आणि मजुरांनी आशा सोडू नये, अशी अमिताभ बच्चन यांची इच्छा आहे. यामुळेच त्यांनी 6 चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे. या प्रत्येक विमानात 180 लोक बसू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार,  4 फ्लाइट्स आज 10 जून आणि 2 फ्लाइट्स 11 जूनला रवाणा होणार आहेत. सांगण्यात येते, की ही विमाने गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी आहेत.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

29 मेरोजी 10 बसेसदेखील पाठवल्या होत्या - 
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील मजुरांसाठी बसेसची व्यवस्थाही केली होती. 29 मेरोजी त्यांनी माहीम दर्गाह ट्रस्ट आणि हाजी अली दर्गाह ट्रस्टच्या सोबतीने 10 बसेस हाजी अलीहून रवाना केल्या होत्या. या बसेसने उत्तर प्रदेशातील लखनौ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोही आदी जिल्ह्यांशी संबंधित जवळपास 250 मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. या बसेसमध्ये मजुरांच्या खाण्यापिण्यासह मेडिकल किटचीही व्यवस्था करण्यात आली होती. 

भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही

Web Title: amitabh bachchan helping up migrants arranged six charted fights to reach them at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.