अमिताभ बच्चन इफ्फीचे पर्सनॅलिटी आॅफ द ईयर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:22 PM2017-11-15T22:22:04+5:302017-11-15T22:22:13+5:30
बच्चन यांची चित्रपट कारकिर्द जवळपास अर्धशतकाची असून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार दिला गेला आहे.
नवी दिल्ली : गोव्यात होणाºया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियाचा (इफ्फी) पर्सनॅलिटी आॅफ द ईयर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे, असे माहिती व प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी बुधवारी येथे सांगितले. बच्चन यांची चित्रपट कारकिर्द जवळपास अर्धशतकाची असून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार दिला गेला आहे.
इफ्फीच्या ज्युरीचे सदस्य
अपूर्व असरानींचा राजीनामा
मुंबई : इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियाच्या (इफ्फी) गोव्यातील महोत्सवातून दोन चित्रपट माहिती व प्रसारण मंत्रालयाने रद्द केल्याच्या निषेधार्थ महोत्सवाचे ज्युरी सदस्य व पटकथा लेखक अपूर्व असरानी यांनी बुधवारी राजीनामा दिला.
इफ्फीच्या इंडियन पॅनोरामा विभागातून एस. दुर्गा (मल्याळम) आणि न्यूड (मराठी) हे चित्रपट मंत्रालयाने रद्द केल्यानंतर इंडियन पॅनोरामा ज्युरीच्या अध्यक्षपदाचा चित्रपट दिग्दर्शक सुजोय घोष यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता. माझी सद्सद््विवेकबुद्धी मला या महोत्सवात सहभागी होऊ नये, असे सांगते, असे असरानी यांनी निवेदनात म्हटले. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव गोव्यात होत आहे. काही खूपच गंभीर चित्रपटांबद्दल आमची काही जबाबदारी होती व त्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो. मी अध्यक्षांच्या बरोबर आहे, असे ते म्हणाले. १३ सदस्यांच्या ज्युरी मंडळाने शिफारस केलेले एस. दुर्गा व न्यूड हे चित्रपट मंत्रालयाने रद्द केले. एस. दुर्गाचे दिग्दर्शक सनल कुमार ससीधरन यांनी मंत्रालय आणि इफ्फीच्या अधिकाºयांच्याविरोधात केरळ उच्च न्यायालयात मंगळवारी याचिका दाखल केली.