पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:21 AM2020-06-25T11:21:32+5:302020-06-25T11:22:31+5:30

गेल्या 19 दिवसांत डिझेलच्या किंमतीमध्ये 10.62 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 8.66 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. 

Amitabh Bachchan's 2012 Tweet Taking Jibe at Fuel Price Rise Goes Viral; Diesel Touches Record High of Rs 80 | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

Next

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. सलग 19व्या दिवशी या किमती वाढल्या आणि इतिहासात पहिल्यांदा डिझेलची किंमत ही पेट्रोलपेक्षा अधिक झाली आहे. डिसेलच 0.14 पैशांनी वाढून 80.02 प्रति लिटर झाले आहे. पेट्रोलची किंमत 0.16 पैशांनी वाढून 79.92 रुपये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन हे ट्रोल होत आहे. त्यांनी 2012मध्ये केलेले एक ट्विट नेटिझन्सनी व्हायरल केलं असून बिग बींना पुन्हा तसं ट्विट करण्याची विनंती केली जात आहे.

2012वर्षाच्या अखेरपर्यंत डिझेलची किंमत ही पेट्रोलच्या किंमतीपेक्षा कमी होती. 2002 ते 2012 पर्यंत पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत तफावत होती. आता पेट्रोल 80 रुपयांच्या घरात, तर डिझेल 80 पार गेले आहे.  2012मध्ये बच्चन यांनी पेट्रोलची किंमत 8 रुपयांनी वाढल्यानंतर एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की,''पेट्रोल 7.5रुपयांनी महागलं. पेट्रोल पंपवरील कर्मचारी- कितने का डालू? मुंबईकर - 2.4 रुपयांच्या पेट्रोलनं कारवर स्प्रे करून टाक भावा, कार पेटवायची आहे.''


आता 8 वर्षानंतर नेटिझन्सनी बिग बींना ट्रोल केले आहे आणि पुन्हा असं ट्विट करण्याची मागणी केली आहे.






आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (Petrol-Diesel price today) पार उतरलेल्या असताना भारतात मात्र पेट्रोलपेक्षाडिझेलच्या किंमती नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. काल देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षाडिझेलचे दर जास्त झालेले असताना आजचा विक्रमही न भूतो असाच आहे. देशात सलग 19 दिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.  

रोज 50 ते 60 पैशांनी वाढणाऱ्या इंधनाच्या दराने आज काहीसा दिलासा दिला. आज डिझेलमध्ये 14 पैसे आणि पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली. देशात इंधनाचे सर्वात कमी दर हे आधी दिल्लीमध्ये होते. मात्र, आता त्याच्या उलट झाले आहे. देशात सर्वाधिक दर आता दिल्लीमध्ये आहेत. आज दिल्लीमध्ये डिझेलची किंमत 79.88 रुपयांनी वाढून 80.02 रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर 86.70 आमि डिझेल 78.34 रुपये झाला आहे. यानंतर चेन्नईमध्ये डिझेल 77.29 रुपये झाला आहे. 
 

Web Title: Amitabh Bachchan's 2012 Tweet Taking Jibe at Fuel Price Rise Goes Viral; Diesel Touches Record High of Rs 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.