जया बच्चनला राजकारणात घेऊ नका अमिताभने दिला होता सल्ला
By admin | Published: May 5, 2016 12:27 PM2016-05-05T12:27:48+5:302016-05-05T13:01:50+5:30
काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले अमरसिंह यांनी जया बच्चन यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले अमरसिंह यांनी जया बच्चन यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. पनामा पेपर लीक प्रकरणात अमिताभ यांचे नाव आले आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी ही विधाने केली.
बच्चन कुटुंबातील सूनबाई ऐश्वर्या रायने मला नेहमीच आदर दिला आहे. अभिषेकनेही माझ्या विरोधात कधी एक शब्दही उच्चारला नाही. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही माझा काही वाद नाही असे अमरसिंह यांनी सांगितले. मात्र जया बच्चन यांच्याबद्दल त्यांनी वेगळी मते व्यक्त केली.
जया बच्चन यांना राजकारणात प्रवेश देऊ नको असे अमिताभ यांनी मला सांगितले होते. पण मी त्यांचा हा महत्वाचा सल्ला ऐकला नाही असे अमरसिंह म्हणाले. जया बच्चन यांचा अस्थिर स्वभाव आणि सवयींमुळे त्यांना राजकारणात एंट्री न देण्याचा अमिताभ यांनी आपल्याला सल्ला दिला होता असे अमरसिंह यांनी सांगितले.
पनामा प्रकरणाचे प्रश्न तुम्ही जाऊन अरुण जेटलींना विचारा. त्यांचे सरकार चौकशी करत आहे. आता मला बच्चन या नावाशिवाय समाधानाने जगू द्या असे अमरसिंह यांनी सांगितले. दशकभरापूर्वी अमरसिंह बच्चन कुटुंबाच्या अत्यंत जवळ होते. अमिताभ यांच्याबरोबर त्यांची घनिष्ट मैत्री होती. बच्चन कुटुंबातील प्रत्येक कौटुंबिक सोहळयात त्यांचा वावर असायचा.
अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाच्यावेळी ही मैत्री अधिक प्रकर्षाने समोर आली होती. मुलायमसिंह यादव यांच्याबरोबर त्यांचे मतभेद झाल्यानंतर बच्चन कुटुंबाने अमरसिंह यांना साथ देण्याऐवजी मुलायमसिंह यादव यांना साथ दिली. त्यानंतर अमरसिंह बच्चन कुटुंबापासून दूर गेले.