रेल्वेच्या खासगीकरणाचे अमिताभ कांत यांच्याकडून स्वागत; २0२७ पर्यंत १५१ रेल्वे येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 06:03 AM2020-09-18T06:03:39+5:302020-09-18T06:03:56+5:30

खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेला तसेच गुंतवणूकदारांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. कारण आतापर्यंत प्रवाशांच्या ज्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचता आले नव्हते तो हाती लागेल, असेही कांत म्हणाले.

Amitabh Kant welcomes privatization of railways; By 2027, 151 trains will arrive | रेल्वेच्या खासगीकरणाचे अमिताभ कांत यांच्याकडून स्वागत; २0२७ पर्यंत १५१ रेल्वे येतील

रेल्वेच्या खासगीकरणाचे अमिताभ कांत यांच्याकडून स्वागत; २0२७ पर्यंत १५१ रेल्वे येतील

Next

नवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात रेल्वेच्या खासगीकरणाच्या रेल्वे मंत्रालयाच्या अमलात येणाऱ्या योजनेचे निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी गुरुवारी वृत्तपत्रांशी बोलताना स्वागत केले. कांत म्हणाले, या पुढाकारामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा वापर करून प्रवाशांच्या वाहतुकीचे काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल. यासाठी रिक्वेस्ट फॉर कोटेशन आधीच करण्यात आली असून, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ आॅक्टोबर आहे.
खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेला तसेच गुंतवणूकदारांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. कारण आतापर्यंत प्रवाशांच्या ज्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचता आले नव्हते तो हाती लागेल, असेही कांत म्हणाले.

बारा खासगी रेल्वे...
2023 मध्ये रेल्वेने बनवलेल्या नियोजनानुसार पहिल्या १२ खासगी रेल्वे सेवेत येतील. त्यानंतर आणखी ४५ रेल्वे नव्या आर्थिक वर्षात दाखल होतील.
2027 पर्यंत अशा १५१ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आणायच्या आहेत, असे अधिकाºयाने सांगितले.

Web Title: Amitabh Kant welcomes privatization of railways; By 2027, 151 trains will arrive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे