अॅम्नेस्टीवर देशद्रोहाचे आरोप योग्यच - हेगडे
By admin | Published: August 20, 2016 01:37 AM2016-08-20T01:37:41+5:302016-08-20T01:37:41+5:30
बंगळुरू शहरात ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ या संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात भारतविरोधी कथित घोषणा दिल्याच्या प्रकरणात या
हैदराबाद : बंगळुरू शहरात ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ या संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात भारतविरोधी कथित घोषणा दिल्याच्या प्रकरणात या संघटनेविरुद्ध देशद्रोहाचे करण्यात आलेले आरोप रास्तच आहेत, असे माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी म्हटले आहे. न्या. हेगडे यांनी एकूणच ‘अॅम्नेस्टी’च्या विश्वासार्हतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भारताचे माजी सॉलिसिटर जनरल संतोष हेगडे म्हणाले की, या संघटनेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी अशा घोषणा दिल्या नाहीत, असे सांंगून ही संघटना आपली जबाबदारी टाळू
शकत नाही. कारण, हे व्यासपीठ तर तुम्हीच उपलब्ध करून
दिले होते.
काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा देणे देशद्रोह आहे, तसेच अशा घोषणा देणेही देशद्रोहच आहे. सैनिक मारले जातात तेव्हा ही अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था काय करते? असा सवालही न्या. हेगडे यांनी केला. (वृत्तसंस्था)