सेन्सॉरशिपच्या नियमांविरोधात अमोल पालेकर यांनी दाखल केली याचिका

By admin | Published: April 17, 2017 12:36 PM2017-04-17T12:36:13+5:302017-04-17T12:37:19+5:30

सेन्सॉरशिपच्या नियमात बदल व्हावेत या मागणीसाठी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Amol Palekar filed a petition against censorship rules | सेन्सॉरशिपच्या नियमांविरोधात अमोल पालेकर यांनी दाखल केली याचिका

सेन्सॉरशिपच्या नियमांविरोधात अमोल पालेकर यांनी दाखल केली याचिका

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 17 - चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या सेन्सॉरशिपच्या नियमात बदल व्हावेत या मागणीसाठी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अमोल पालेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरुन न्यायमूर्ती एके सीकरी आणि अशोक भूषण यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. 
 
सेन्सॉर बोर्डावर न्यायालयीन पार्श्वभूमीचा एकही सदस्य नसल्याने चित्रपटाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष होते असे याचिकाकर्त्याचे वकिल गोपाल सुब्रमण्यम यांनी न्यायालयाला सांगितले. पालेकर यांनी याचिकेमध्ये सिनोमॅटोग्राफी कायद्यातील तरतुदींना आव्हान दिले आहे. 
 
आजच्या इंटरनेटच्या जमान्यात सेन्सॉरशिप अयोग्य असल्याचे पालेकर यांचे मत आहे. पालेकर यांनी सेन्सॉरशिपच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, काही मार्गदर्शक तत्वे आखून देण्याची विनंती केली आहे. 
 
 

Web Title: Amol Palekar filed a petition against censorship rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.