भाजपाच्या ९९ विजेत्यांमध्ये काँग्रेसमधून फुटलेले ७ जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:23 AM2017-12-19T01:23:38+5:302017-12-19T01:23:57+5:30
भाजपाचे जे ९९ उमेदवार यंदा विजयी झाले आहेत, त्यापैकी ७ जण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. शंकरसिंह वाघेला यांच्याबरोबर काँग्रेसमधून जे आमदार फुटले, त्यातील काही जण भाजपामध्ये गेले होते. त्यापैकी भाजपाने ९ जणांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी ७ विजयी झाले. त्यातील के. सी. राऊळभाई हे अवघ्या ९६ मतांनी विजयी झाले.
महेश खरे
सुरत : भाजपाचे जे ९९ उमेदवार यंदा विजयी झाले आहेत, त्यापैकी ७ जण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. शंकरसिंह वाघेला यांच्याबरोबर काँग्रेसमधून जे आमदार फुटले, त्यातील काही जण भाजपामध्ये गेले होते. त्यापैकी भाजपाने ९ जणांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी ७ विजयी झाले. त्यातील के. सी. राऊळभाई हे अवघ्या ९६ मतांनी विजयी झाले.
राजकारण बदलले-
भाजपाने २0१२ साली ११६ जागी विजय मिळविला होता. तेवढ्या जागाही यंदा मिळविता आल्या नाहीत.
२0१४ साली लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २६ जागी भाजपा निवडून आली होती आणि त्यातील १६५ विधानसभा मतदार संघांत भाजपाने काँग्रेसपेक्षा मतांची आघाडी घेतली होती.
म्हणजे तेव्हा केवळ १७ जागीच काँग्रेस आघाडीवर होती. अशा स्थितीत भाजपाला यंदा ९९ जागा मिळणे व काँग्रेसने १७ वरून ८0 पर्यंत जाणे, ही येथील राजकारणातील महत्त्वाची बाब आहे.