ओडिशातील शाळांमध्येही आता ‘शून्य तास’, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:56 AM2018-01-04T01:56:03+5:302018-01-04T01:56:26+5:30
मुलांमध्ये सर्जनशीलता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागण्यासाठी प्रोत्साहन म्हणून निवडक शाळांमध्ये आठवड्यातून एकदा शून्य तास संकल्पना राबवण्याचा निर्णय गंजम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
बेहरामपूर (ओडिशा) - मुलांमध्ये सर्जनशीलता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागण्यासाठी प्रोत्साहन म्हणून निवडक शाळांमध्ये आठवड्यातून एकदा शून्य तास संकल्पना राबवण्याचा निर्णय गंजम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या शून्य तासात मुलांना त्यांच्या आवडत्या गोष्टी त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली करण्यास मुभा असेल, असे अधिकाºयाने सांगितले.
ही शून्य तास संकल्पना सुरवातीला काही निवडक शाळांमध्ये राबवली जाईल. तिला किती व कसा प्रतिसाद लाभतो हे पाहून इतर शाळांमध्ये राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात गंजम जिल्ह्यातील चार
हजार शाळांपैकी ३५० शाळांमध्ये
हा किमान तासभर चालणारा शून्य तास सुरू केला जाईल, असे जिल्हा शिक्षण अधिकारी सनातन पांडा म्हणाले. (वृत्तसंस्था)
वाढेल आत्मविश्वास, बुद्धिमत्ता
या तासात अभ्यासाच्या पुस्तकातील काहीही शिकवले जाणार नाही की
शिकावे लागणार नाही, असे जिल्हाधिकारी प्रेम चंद्र चौधरी यांनी सगळ््या मुख्याध्यापकांना आणि गट शिक्षण अधिकाºयांना या संकल्पनेचा तपशील सांगणाºया पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
मुलांना या तासात वेगवेगळ््या विषयांवर निरीक्षण, विश्लेषण करायला आणि स्वत:चे मत तयार करायला मुभा राहील. या प्रयोगामुळे मुलांमधील बुद्धिमत्ता, विचारशक्ती, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकसित व्हायला मदत होईल अशी अपेक्षा आहे, असे चौधरी म्हणाले.