पंधरा दिवसांत मिळेल पीक विम्याची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 04:48 AM2018-08-06T04:48:47+5:302018-08-06T04:49:02+5:30

पीक विम्याची रक्कम १५ दिवसांत देण्यात येणार आहे. यासाठी सरकार आॅक्टोबरपासून ‘क्रॉप लॉस रिपोर्टिंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप आणणार असून, त्याद्वारे ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

The amount of crop insurance available in fifteen days | पंधरा दिवसांत मिळेल पीक विम्याची रक्कम

पंधरा दिवसांत मिळेल पीक विम्याची रक्कम

Next

नवी दिल्ली : पीक विम्याची रक्कम १५ दिवसांत देण्यात येणार आहे. यासाठी सरकार आॅक्टोबरपासून ‘क्रॉप लॉस रिपोर्टिंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप आणणार असून, त्याद्वारे ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. यंदा ५ कोटी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे. शेतकºयाने कोणत्याही कारणाने पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासात त्याचे छायाचित्र अ‍ॅपवर लोड करावे लागेल. पुढल्या १0 दिवसांत विमा कंपन्या नुकसानीचे सर्वेक्षण करतील अन् त्यानंतर पुढल्या १५ दिवसात विम्याचे पैसे अदा केले जातील. विमा कंपन्यांनी उशीर केल्यास, शेतकºयाला १२ टक्के व्याजासह रक्कम अदा करावी लागेल. आपली तक्रार फोनने अथवा ईमेलने पाठविण्याचा पर्याय शेतकºयांसाठी उपलब्ध आहे. शेतकºयाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून क्रॉप लॉस रिपोर्टिंग अ‍ॅप्लिकेशन आपल्या मोबाइलवर डाउनलोड करावे लागेल व त्यावर आधार तपशिलांसह शेतीची व पिकांची नोंदणी करावी लागेल.

Web Title: The amount of crop insurance available in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी