अमळनेरात कपाशी पीक विम्यापोटी सर्वाधिक लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2016 10:34 PM2016-06-12T22:34:33+5:302016-06-12T22:34:33+5:30

हवामानावर आधारित पीक विमा योजनेतून २०१५ मध्ये कपाशी पिकासंबंधी अमळनेर तालुक्याला सर्वाधिक १२ कोटी ७५ लाख रुपये रक्कम वितरित झाली आहे.

Amount to get the most benefit from Kapasi Peak Insurance | अमळनेरात कपाशी पीक विम्यापोटी सर्वाधिक लाभ

अमळनेरात कपाशी पीक विम्यापोटी सर्वाधिक लाभ

Next
ामानावर आधारित पीक विमा योजनेतून २०१५ मध्ये कपाशी पिकासंबंधी अमळनेर तालुक्याला सर्वाधिक १२ कोटी ७५ लाख रुपये रक्कम वितरित झाली आहे.
पारोळा, जामनेर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी आठ कोटी ३४ लाख, सहा कोटी ८६ लाख रक्कम वितरित झाली.
जिल्हाभरातील ७६ हजार ६९० शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झाले होते.
एक लाख सहा हजार १८९ हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण जिल्हाभरात घेण्यात आले होते.
जिल्हाभरात एकूण ५९ कोटी १६ लाख दोन हजार रुपये रक्कम कपाशी पीक विमा योजनेतून लाभार्थी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली.

कपाशीबाबत पीक विमा योजनेतून दिलेल्या रकमेची माहिती
(रक्कम लाखात)
जळगाव- १९८.८
भुसावळ- १५०.८
बोदवड- १५०.८
यावल- १२४.१
रावेर- ११५.३
मुक्ताईनगर- ४८६.१
अमळनेर- १२७५.४
धरणगाव- ५८.३
चोपडा- ८२१.१
एरंडोल- २२२.०
पारोळा- ८३४.६
पाचोरा- ४२८.७
चाळीसगाव- २५५.०
भडगाव- १०९.०
जामनेर- ६८६.३

Web Title: Amount to get the most benefit from Kapasi Peak Insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.