चेन्नईत विमानतळावरून जप्त केले १.३४ कोटी रुपये

By admin | Published: December 23, 2016 01:48 AM2016-12-23T01:48:36+5:302016-12-23T01:48:48+5:30

महसूल गुप्तचर संचालनालयाने येथील विमानतळावर गुरुवारी पाच जणांच्या टोळीकडून दोन हजारच्या नोटांत १.३४ कोटी रुपये

An amount of Rs 1.34 crore was recovered from Chennai airport | चेन्नईत विमानतळावरून जप्त केले १.३४ कोटी रुपये

चेन्नईत विमानतळावरून जप्त केले १.३४ कोटी रुपये

Next

चेन्नई : महसूल गुप्तचर संचालनालयाने येथील विमानतळावर गुरुवारी पाच जणांच्या टोळीकडून दोन हजारच्या नोटांत १.३४ कोटी रुपये व विदेशी चलन जप्त केले.
ही टोळी भारताबाहेर विदेशी चलनाची तस्करी करण्यात गुंतली असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल संचालनालयाच्या येथील विभागीय अधिकाऱ्यांनी पहाटे अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाच जणांना हटकले. त्यांच्या बॅगांमध्ये दोन हजारच्या नव्या नोटांतील १.३४ कोटी रुपये आणि सात हजार अमेरिकन डॉलर (४.७६ लाख रुपये) आढळले, असे संचालनालयाने निवेदनात म्हटले. (वृत्तसंस्था)
उत्तर प्रदेशात २० लाख जप्त
संभळ (उत्तर प्रदेश) येथे दोन जणांकडून पोलिसांनी २० लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी विष्णु श्रीवास्तव आणि रणजित कुमार यांना अटक करण्यात आली.
च्या दोघांची कार पोलिसांनी बुधवारी रात्री येथील चंदाऊसी भागात अडवल्यावर २ बॅग्जमध्ये नव्या नोटा आढळल्या, असे उपविभागीय दंडाधिकारी अमित कुमार यांनी गुरुवारी सांगितले.
च्त्यांच्याकडील बॅगा प्राप्तीकर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्यावर त्यात १६ लाख रुपयांच्या नव्या नोटा व उर्वरीत नोटा १००,५० व १० रुपये मूल्यांच्या होत्या. ही रक्कम मोरादाबादच्या अंशुल कुमारची असल्याचा दावा या दोघांनी केला.
एक लाखाच्या बनावट नोटा जप्त : मालदा (पश्चिम बंगाल) येथे बनावट चलनातील एक लाख रुपये जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली. येथील सुजापूरमध्ये ही कारवाई बुधवारी रात्री झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हे बनावट चलन ५००च्या नोटांतील होते. बिहारचे रहिवासी असलेले ते दोघेही अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते.
माजी मुख्य सचिवाच्या मुलाकडे ५ कोटी बेहिशेबी
तमिळनाडुचे माजी मुख्य सचिव पी. राममोहन राव यांचा मुलगा विवेक पापिसेट्टी याच्या येथील घरी हाती लागलेले पाच कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न प्राप्तीकर विभागाने बुधवारी उघडकीस आणले.
च्विवेकच्या घरावर प्राप्तीकर विभागाने गुरुवारी दुसऱ्या
दिवशीही झडती सत्र सुरूच ठेवले. बुधवारी प्राप्तीकर विभागाने पी.राममोहन राव यांचे चेन्नई, बंगळुरू आणि आंध्र प्रदेशातील निवासस्थान आणि कार्यालयांची झडती घेऊन ३० लाख रुपये रोख व पाच किलो सोने जप्त केले.

Web Title: An amount of Rs 1.34 crore was recovered from Chennai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.