'त्या' संकटांनं केलं भीषण स्वरूप धारण, मोदी अन् शहांनी घेतला परिस्थितीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 11:21 AM2020-05-19T11:21:40+5:302020-05-19T13:02:12+5:30
पंतप्रधानांनी आपत्ती निवारण प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) केलेल्या तयारीचा, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
नवी दिल्लीः 'अम्फान' चक्रीवादळाचं एका सुपर चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं धोका वाढला आहे. 20 मे रोजी हे चक्रीवादळ तीव्र वेगानं पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकू शकते. यामुळे ओडिशातील किनारपट्टी व पश्चिम बंगालच्या गंगानदीजवळील भागात जोरदार वा-यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 'अम्फान'मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएमओने निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी आपत्ती निवारण प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) केलेल्या तयारीचा, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
गृहराज्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) च्या अधिका-यांसमवेत पंतप्रधानांची काल बैठक झाली. एक तासापेक्षा जास्त काळ ही बैठक चालली. त्यात गृहमंत्री अमित शहा हेदेखील उपस्थित होते. त्यातील वाऱ्याचा वेग ताशी २३० किमीपर्यंत वाढला आहे. दरम्यान, मान्सूनची वाटचाल सुरू असून सोमवारी मान्सूनने निकोबार बेटे व्यापली आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे रुपांतर सोमवारी दुपारी सुपर चक्रीवादळात झाले. यावेळी त्याचा जोर कमी होऊन तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले असेल. यावेळी किनारपट्टीवर ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi holds meeting with Ministry of Home Affairs (MHA) & National Disaster Management Authority (NDMA) officials to review the situation arising out of #CycloneAmphan in different parts of the country. Home Minister Amit Shah also present. pic.twitter.com/cxR5rXbsGf
— ANI (@ANI) May 18, 2020
दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात पुणे आणि परभणी येथे पूर्व मोसमी पाऊस झाला. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. वेगाने हे चक्रीवादळ किनारपट्टीच्या दिशेने उत्तरेला पुढे येत आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'
जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले
CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत
कोरोनापाठोपाठ भारतात लवकरच धडकणार दुसरं मोठं संकट; मोदींनी बोलावली तात्काळ बैठक
CoronaVirus: ...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप
CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार