"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 09:19 AM2020-08-19T09:19:20+5:302020-08-19T09:22:04+5:30
सतलज-यमुना कालव्याचे काम पूर्ण झाल्यास पंजाब पेटून उठेल आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण होईल असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.
चंदिगड - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे. सतलज-यमुना कालव्याचे काम पूर्ण झाल्यास पंजाब पेटून उठेल आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण होईल असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. यांसदर्भात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंजाबमधील या परिस्थितीचा राजस्थान आणि हरियाणावरही परिणाम होईल असं म्हटलं आहे.
पंजाब आणि हरियाणा सरकारमध्ये मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बघितला गेला पाहिजे असं यावेळी अमरिंदर सिंग म्हणाले. तुम्ही जर सतलज-यमुना कालव्याच्या मुद्यावर पुढे जात असाल तर पंजाब पेटून उठेल आणि ही राष्ट्रीय समस्या बनेल. पंजाबमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीचा परिणाम हरियाणा आणि राजस्थानवरही होईल. मात्र, ही बैठक सकारात्मक होती असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.
SYL मुद्दे को लेकर आज मुख्यमंत्री श्री @mlkhattar ने केंद्रीय जल शक्ति मंत्री श्री @gssjodhpur की उपस्थिति में वीडियो कॉन्फ़्रेंसिंग के माध्यम से पंजाब के मुख्यमंत्री श्री @capt_amarinder के साथ बैठक की। pic.twitter.com/i9GBgYJuwB
— CMO Haryana (@cmohry) August 18, 2020
पंजाब सरकार या कालव्याच्या प्रश्नावर असलेल्या आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पहिल्यांदाच या विषयावर मोकळेपणाने चर्चा झाली असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बैठकीनंतर सांगितलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील उपस्थिती लावली होती.
अमित शहा उपचारांसाठी एम्समध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसने साधला निशाणा https://t.co/IG5olEWwN2#BJP#AmitShah#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2020
सतलज-यमुना लिंक कालव्याचा प्रश्न हा तब्बल 44 वर्ष जुना आहे. मार्च 1976 मध्ये केंद्र सरकारने पंजाबच्या 7,2 दशलक्ष घनफूट पाण्यापैकी 3.5 दशलक्ष घनफूट पाणी देण्याची अधिसूचना जारी केली होती. यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पतियाळा येथील सतलज यमुना लिंक कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर राजीव गांधी सरकारमध्ये कालवा बांधण्याच्या निर्णयावर सहमती झाली होती. पण हा निर्णय करारानुसार अंमलात आलेला नाही. यामुळे हरियाणा सरकारने 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भाजपाच्या अध्यक्षांनी राहुल गांधींवर केला गंभीर आरोप, म्हणाले...https://t.co/0t8qijWyFr#Congress#BJP#RahulGandhi#NarendraModi
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल
"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...
धक्कादायक! तब्बल 4 महिने आईच्या मृतदेहाजवळ बसून होती मुलगी
बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?