Amrish Tyagi soldier: जन्मानंतर १६ वर्षांनी पहिल्यांदाच मुलीने पाहिला पित्याचा चेहरा; शहीद जवानावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 09:48 AM2021-09-29T09:48:57+5:302021-09-29T09:51:43+5:30

Indian army soldier heart touching Story: जेव्हा सैन्याचा जवान शहीद होतो, तेव्हा देशभरात हळहळ व्यक्त होते. कोणाचे नुकतेच लग्न झालेले असते, तर कोणी आपल्या अपत्याचा चेहराही पाहिलेला नसतो. कोणाचा एकुलता एक मुलगा असतो. खरंच सलाम त्या खऱ्या देशभक्तांना आणि त्यांच्या कुटुंबाला.

Amrish Tyagi soldier: 16 year old girl saw her father's face first time; Funeral on Martyr Jawan | Amrish Tyagi soldier: जन्मानंतर १६ वर्षांनी पहिल्यांदाच मुलीने पाहिला पित्याचा चेहरा; शहीद जवानावर अंत्यसंस्कार

Amrish Tyagi soldier: जन्मानंतर १६ वर्षांनी पहिल्यांदाच मुलीने पाहिला पित्याचा चेहरा; शहीद जवानावर अंत्यसंस्कार

googlenewsNext

गाझियाबाद : 16 वर्षांनी एका मुलीने आपल्या शहीद पित्याचा चेहरा पाहिला. काही काळ ती त्याच्याकडे पाहतच राहिली होती. तिचे डोळे खूप काही सांगून जात होते. जेव्हा तिचा पिता शहीद झाला तेव्हा ती आईच्या गर्भात होती. शहीद जवानाची पत्नीदेखील १६ वर्षांपासून त्याची वाट पाहत होती. यादृष्याने अख्खा गाझियाबाद हळहळला.अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. (Indian army jawan Amrish Tyagi dead body found after 16 years in garhwal himalaya)

जेव्हा सैन्याचा जवान शहीद होतो, तेव्हा देशभरात हळहळ व्यक्त होते. कोणाचे नुकतेच लग्न झालेले असते, तर कोणी आपल्या अपत्याचा चेहराही पाहिलेला नसतो. कोणाचा एकुलता एक मुलगा असतो. या जवानाच्या जाण्याने त्याच्या घरातच नाही तर गावात, पंचक्रोशीत आक्रोशाची भावना असते. असेच एक कुटुंब गेल्या १६ वर्षांपासून आपल्या मुलाची वाट पाहत होते.  उत्तर प्रदेशच्या मुरादनगरच्या हिसाली गावात राहणारे जवान अमरीश त्यागी (Amrish Tyagi) यांचा मृतदेह 16 वर्षांनी बर्फाखाली सापडला.

मंगळवारी बिहार रेजिमेंटचे जवान अमरीश त्यागी यांचे पार्थिव घेऊन त्यांच्या गावी दाखल झाले. त्यागी कुटुंबाला त्याच्या मृतदेहासाठी 16 वर्षे वाट पहावी लागली. 23 ऑक्टोबरला सियाचीनहून परतत असताना उत्तराखंडच्या हरशील येथील दरीत 4 जवान कोसळले होते. यापैकी तीन जवानांना मृतदेह सापडला होता. परंतू अमरीश त्यागी यांचा मृतदेह सापडला नव्हता. गेल्या आठवड्यात बर्फ वितळल्यामुळे एक मृतदेह दिसला. त्यावरील कपडे आणि काही कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. 

कुटुंबाला वाटले होते, की अमरीश जिवंत असेल. त्यामुळे त्याचे श्राद्ध घातले नाही. नातेवाईक सांगत असायचे की, अमरीश आता जिवंत नाही. मात्र, कुटुंबाचा त्यावर विश्वास नव्हता. एक ना एक दिवस तो परत येईल अशा आशेवर सारे जगत होते. त्याचे श्राद्धही घातले नव्हते. 

जेव्हा अपघात झाला तेव्हा पत्नी गर्भवती होती...
अमरीश यांचे लग्न 2005 मध्ये मेरठला झाले होते. जेव्हा ते बेपत्ता झाले तेव्हा त्यांची पत्नी गर्भवती होती. या अपघातानंतर ५ महिन्यांनी तिने मुलीला जन्म दिला. या मुलीने पित्याचा चेहरा फक्त फोटोत पाहिला होता. आज तिने १६ वर्षांनी मनात साठवून ठेवलेला पित्याचा चेहरा आठवला. पार्थिवाच्या चेहऱ्याकडे ती बराच वेळ टक लावून पाहत राहिली.

Web Title: Amrish Tyagi soldier: 16 year old girl saw her father's face first time; Funeral on Martyr Jawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.