स्वच्छ भारत मोहिमेसाठी अमृतानंदमयींचे १०० कोटी

By Admin | Published: September 12, 2015 04:51 AM2015-09-12T04:51:36+5:302015-09-12T04:51:36+5:30

अम्मा नावाने परिचित असलेल्या माता अमृतानंदमयी यांच्या मठाने स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शौचालये उभारण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा धनादेश शुक्रवारी

Amritanandmai's 100 crores for Clean India campaign | स्वच्छ भारत मोहिमेसाठी अमृतानंदमयींचे १०० कोटी

स्वच्छ भारत मोहिमेसाठी अमृतानंदमयींचे १०० कोटी

googlenewsNext

कोल्लाम (केरळ): अम्मा नावाने परिचित असलेल्या माता अमृतानंदमयी यांच्या मठाने स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शौचालये उभारण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा धनादेश शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपुर्द केला. महिनाभरानंतर मठाकडून आणखी १०० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
देशाची संस्कृती आणि वारशाचे प्रतीक असलेल्या गंगा नदीचे संवर्धन करण्यासाठी नमामी गंगे आणि स्वच्छ भारत मोहिमेत जगभरातील भारतीयांनी योगदान द्यावे, असे आवाहन जेटली यांनी अम्मांच्या मठाने दिलेला धनादेश स्वीकारल्यानंतर केले. हे योगदान जगभरातील भारतीयांसाठी प्रतीकात्मक संदेश देणारे आहे, या शब्दांत जेटलींनी माता अमृतानंदमयींच्या कार्याची प्रशंसा केली. गंगा नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या ४० टक्के लोकांच्या जीवनावर या नदीचा प्रभाव आहे. गंगेवर आपण सर्व जण निर्भर असतानाही तिचे संवर्धन करण्याबाबत निष्काळजी बनलो आहोत, असे जेटली म्हणाले. (वृत्तसंस्था)

केवळ सरकारच्या नव्हे, तर नागरिकांच्या सहभागावर ही मोहीम अधिक निर्भर आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्मांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी निधी देऊन मोठे पाऊल उचलले आहे. हा जगभरासाठी प्रतीकात्मक संदेश आहे.
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

Web Title: Amritanandmai's 100 crores for Clean India campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.