'इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही किंमत मोजावी लागेल'; खलिस्तान समर्थक अमृतपालची उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:47 PM2023-02-23T19:47:31+5:302023-02-23T19:49:25+5:30

पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग'च्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला.

amritpal singh amit shah khalistani punjab waris punjab de indira gandhi hindu rashtra | 'इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही किंमत मोजावी लागेल'; खलिस्तान समर्थक अमृतपालची उघड धमकी

'इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही किंमत मोजावी लागेल'; खलिस्तान समर्थक अमृतपालची उघड धमकी

googlenewsNext

पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. यादरम्यान सहा पोलीस गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अमृतपाल सिंग याने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी दिली आहे. 'अमित शाह यांनी खलिस्तान चळवळ पुढे जाऊ देणार नाही, असे सांगितले होते. इंदिरा गांधींनीही असेच केले होते, असेच केले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असं उघड उघड अमृतपाल सिंगने म्हटले आहे.

Amritpal Singh Wife: अमृतपाल सिंगची NRI पत्नी किरणदीप कौर कोण आहे? १३ दिवसांपूर्वीच झाला होता विवाह

'जेव्हा लोक हिंदु राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खलिस्तानला विरोध करण्याची किंमत मोजली. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, मग ते पंतप्रधान मोदी असोत, अमित शहा असोत किंवा भगवंत मान असोत, असंही अमृतपाल सिंग म्हणाला. 

याआधीही अमृतपाल सिंह याने एका कार्यक्रमात अमित शाह यांना धमकी दिली होती. इंदिरा गांधींनीही दबाव टाकला होता, त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांना माहीत आहे, असं अमृतपाल सिंह म्हणाला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच खलिस्तान समर्थकांबाबत आपली भूमिका मांडली आहे. पंजाबमधील खलिस्तान समर्थकांवर सरकार लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले होते. अमृतपालच्या साथीदाराच्या अटकेच्या निषेधार्थ पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या समर्थकांनी तलवारी आणि बंदुकांसह पोलीस बॅरिकेड्स तोडले. अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. अमृतपाल सिंग यांचा जवळचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेविरोधात त्यांचे समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.

सुधीर सुरी हत्येप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर संदीप सिंगला घटनेनंतर काही वेळातच अटक केली होती. त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या गाडीवर खलिस्तानींचे पोस्टर चिकटवण्यात आले होते. याशिवाय संदीपच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील नुकत्याच झालेल्या पोस्टवरून तो कट्टरपंथी असल्याचे समोर आले आहे.संदीप सिंगने अमृतपाल सिंगचे अनेक व्हिडिओ त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केले होते. ज्यामध्ये खलिस्तान समर्थक नेत्याला भेटल्याचा व्हिडिओही होता. 

Web Title: amritpal singh amit shah khalistani punjab waris punjab de indira gandhi hindu rashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.