शरणागतीसाठी अमृतपाल सिंगच्या तीन अटी?; पहिला व्हिडीओही आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 09:27 AM2023-03-30T09:27:29+5:302023-03-30T09:27:40+5:30
अमृतपालने आत्मसमर्पण करण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत.
अमृतसर : वारीस पंजाब देचा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगपंजाबमध्येच लपून बसल्याची शक्यता आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात असलेल्या श्री अकाल तख्त साहिब अथवा बठिंडा येथील तलवंडी साहिब येथील तख्त श्री दमदमा साहिब येथे तो आत्मसमर्पण करू शकतो.
दोन्ही शहरात नाकाबंदी करून वाहनांची झडती घेतली जात आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालने आत्मसमर्पण करण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. पोलिस कोठडीत मारहाण करू नये, पंजाबच्या तुरुंगातच ठेवावे व आत्मसमर्पणाला अटक म्हणू नये. १८ मार्च रोजी फरार झाल्यानंतर अमृतपालचा पहिला व्हिडीओ समोर आला. यात तो देश- विदेशात स्थायिक शीख समुदायाला बैसाखीच्या दिवशी धर्मसभा बोलविण्याचे आवाहन करताना दिसला.