अमृतपाल सिंगचा डाव असा उधळला, साध्या वेशात पोलीस; अटकेपर्यंतचा घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 02:03 PM2023-04-24T14:03:19+5:302023-04-24T14:05:32+5:30

पोलिसांनी खबरदारी घेत तणाव टाळला

Amritpal Singh's plan foiled, police in plain clothes; Events leading up to the arrest | अमृतपाल सिंगचा डाव असा उधळला, साध्या वेशात पोलीस; अटकेपर्यंतचा घटनाक्रम

अमृतपाल सिंगचा डाव असा उधळला, साध्या वेशात पोलीस; अटकेपर्यंतचा घटनाक्रम

googlenewsNext

चंडीगड : जर्नेलसिंग भिंद्रनवाला यांचा जन्म रोडे गावात झाला होता, तेथेच कट्टरपंथी अमृतपाल सिंग  पकडला गेला. येथेच अमृतपाल ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख बनला होता. अमृतपालला समर्थकांसोबत आत्मसमर्पण करून ताकद दाखवायची होती. त्यासाठी रविवारची निवड करण्यात आली; परंतु पोलिसांनी सर्व खबरदारी बाळगत त्याला एकट्याला अटक करून तणाव टाळला.

साध्या वेशात पोलिस
अमृतपालच्या जवळच्या मित्रांनी पंजाब पोलिसांना त्याच्या आत्मसमर्पण योजनेबद्दल सांगितले होते. गर्दी जमल्यास वातावरण बिघडू शकते, अशी भीती पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांचे पथक साध्या वेशात गुरुद्वाराबाहेर पोहोचले व पहाटे त्याला अटक केली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगला बैसाखीच्या दिवशी म्हणजेच १४ एप्रिल रोजी आत्मसमर्पण करायचे होते. त्याने तख्त श्री दमदमा साहिब, तलवंडी साबो, भटिंडा येथे आत्मसमर्पण करण्याची योजना आखली होती. याची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी तेथे कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यानंतर २२ एप्रिल रोजी तो रोडे गावात पोहोचला, तिथे पोलिसांनी त्याला पकडले.

n२९ सप्टेंबर २०२२ :  अमृतपाल सिंग याची मोगाच्या रोडे गावात ‘दस्तर बंदी’ (पगडी बांधणे) कार्यक्रमात अभिनेते आणि कार्यकर्ते दीप सिद्धू यांनी स्थापन केलेल्या ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती.
n१६ फेब्रुवारी २०२३ : लवप्रीत सिंग तुफानसह अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांवर रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब येथील रहिवाशाचे अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
n१७ फेब्रुवारी २०२३ : लवप्रीत सिंगला अटक.
n२३ फेब्रुवारी २०२३ : अमृतसरमध्ये अमृतपाल सिंगने अजनाळा पोलिस ठाण्यात प्रवेश केला. तलवारी आणि बंदुका घेऊन लवप्रीत सिंगच्या सुटकेची मागणी करत पोलिसांशी झटापट केली.
n२४ फेब्रुवारी २०२३ : लवप्रीत सिंगची न्यायालयीन कोठडीतून सुटका.
n१८ मार्च २०२३ : पंजाब पोलिसांनी अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई सुरू केली. जालंधरमध्ये त्यांचा ताफा थांबला होता. मात्र, तो वाहन बदलून पोलिसांना चकमा देत पळून गेला. 
n२० मार्च २०२३ : अमृतपालचे काका हरजित सिंग आणि आणखी एका व्यक्तीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण.
n२५ मार्च २०२३ : अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी अमृतपालला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितले.
n२० एप्रिल २०२३ : अमृतपालची पत्नी किरणदीप कौर यांना अमृतसरमधील श्री गुरू रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर लंडनला जाणाऱ्या विमानात चढण्यापासून रोखले.
n२३ एप्रिल २०२३ : अमृतपालला मोगा जिल्ह्यातील रोडे गावातून अटक करण्यात आली. यावेळी माेठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Amritpal Singh's plan foiled, police in plain clothes; Events leading up to the arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.