अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:26 IST2025-04-22T11:24:55+5:302025-04-22T11:26:02+5:30

वारिस पंजाब दे टीम या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या लीक झालेल्या चॅटमधून अमित शाह, काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू आणि बिक्रम मजिठिया यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले आहे.

Amritpal supporters plotted to attack many leaders including Amit Shah Big revelation from chat | अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू आणि अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी मोगा येथून दोघांना अटक केली आहे. "वारीस पंजाब डे टीम" या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या लीक झालेल्या चॅटमधून हा कट उघड झाला आहे. हा व्हॉट्सअॅप ग्रुप अमृतपाल सिंह याच्या समर्थकांकडून चालवला जात होता, सध्या एनएसए अंतर्गत आसाममधील दिब्रुगड तुरुंगात आहे.

"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

सोशल मीडियावर लीक झालेल्या चॅटमध्ये अमित शहा, बिट्टू, मजिठिया आणि तलवारा यांसारख्या नेत्यांवर हल्ला करण्याच्या योजनांचा उल्लेख होता. परदेशी निधी, शस्त्रास्त्रांची खरेदी आणि प्रक्षोभक साहित्याचा प्रचार यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवरही या ग्रुपमध्ये चर्चा झाली.

पोलिसांनी कारवाई केली

पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य कट रचणारे लखदीप सिंह सरदारगढ, बलकर सिंह आणि पवनदीप सिंह यांची ओळख पटवली आहे. दरम्यान, बलकार सिंह आणि पवनदीप सिंह यांना अटक करण्यात आली आहे. मोगा येथील सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी, यूएपीए आणि आयटी कायद्याच्या अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

मजिठिया यांचे मोठे दावे

बिक्रम मजिठिया यांनी अमृतपाल याच्या कथित ऑडिओ क्लिप्स प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये त्याचे गुंडांशी असलेले त्यांचे संबंध, लुटलेल्या वस्तू आणि राजकीय संगनमत याबद्दल बोलत आहे. मजिठिया यांनी एनआयए चौकशीची मागणी केली आहे आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मौन बाळगल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सुरक्षा एजन्सींनी लीक झालेल्या चॅटला गांभीर्याने घेतले आहे असून नेत्यांची सुरक्षा वाढवली आहे.

Web Title: Amritpal supporters plotted to attack many leaders including Amit Shah Big revelation from chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.