चाइल्ड पॉर्न पाहण्यात अमृतसर नंबर 1, दिल्ली दुस-या क्रमांकावर
By Admin | Published: January 22, 2017 04:30 PM2017-01-22T16:30:09+5:302017-01-22T16:43:54+5:30
अमेरिकेचे भाषा शास्त्रज्ञ जेम्स कर्क यांच्या अटकेनंतर त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - अमेरिकेचे भाषा शास्त्रज्ञ जेम्स कर्क यांच्या अटकेनंतर त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून 30 हजारांहून अधिक चाइल्ड पॉर्नशी संबंधित फायली जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. फायलींमधील मजकुरावरून चाइल्ड पॉर्न समाजात किती खोलवर रुजले आहे हे समोर आलं आहे. इंटरनेटवर चाइल्ड सेक्सश्युल अब्यूज मटेरियल (CSAM) सर्च करण्यासाठी लहान शहरांपासून मेट्रो शहरं आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.
चाइल्ड पॉर्न संबंधित मटेरियल शेअर करण्यासाठी अमृतसर, लखनऊ, अलापुझा, त्रिपुरा सारखी शहरं आघाडीवर आहेत. सर्वात पुढे अमृतसर आहे. 1 जुलै 2016 ते 15 जानेवारी 2017पर्यंत चाइल्ड पॉर्नशी संबंधित 4 लाख 30 हजारांहून अधिक फायली शेअर करण्यात आल्या आहेत. दिल्ली दुस-या क्रमांकावर आहे, तर लखनऊ तिस-या स्थानी आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, आग्रा, कानपूर, बैराकपूर आणि दिमापूरमध्ये चाइल्ड पॉर्न पाहणा-यांची संख्या लक्षणीय आहे. चाइल्ड पॉर्नशी संबंधित हा डेटा कॉम्प्युटरच्या आयपी एड्रेसवर आधारित आहे.
(सेक्स करताना कंडोम न वापरल्याने बलात्काराचा गुन्हा)
(गणिताच्या होमवर्कमध्ये विचारला सेक्ससंबंधी प्रश्न)
आयपी मास्किंगद्वारे लोकेशन्सशी छेडछाड करण्यात आली आहे. सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांच्या मते, चाइल्ड पॉर्न पाहणे किंवा डाऊनलोड करणं कायद्यानं गुन्हा आहे. सेंटर फॉर प्रिव्हेन्शन अँड हीलिंग ऑफ चाइल्ड सेक्सुश्यल अब्यूजच्या विद्या रेड्डींच्या मतानुसार, भारतात चाइल्ड पॉर्न पाहणा-यांच्या वेबसाइटचे सर्व्हर रूम रशियात असू शकतो, तर पेमेंट स्कॉटलँड होत असेल. तसेच ऑस्ट्रियामध्ये वेबसाइट होस्टिंग होत असेल. चाइल्ड पॉर्नशी संबंधित असे गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोलिसांनी सहकार्य करण्याचं गरजेचं आहे.