ट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 10:10 PM2018-10-19T22:10:13+5:302018-10-19T22:10:41+5:30

अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आयोजित करण्यात आलेल्या या रावणदहनाच्या कार्यक्रमाला पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या.

Amritsar Train Accident : Navjot Singh Sidhu's wife was the chief guest at the celebrations | ट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप

ट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप

Next

अमृतसर - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आयोजित करण्यात आलेल्या या रावणदहनाच्या कार्यक्रमाला पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच नवज्योत सिंह सिद्धू आणि त्यांच्या पत्नींनी घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. 




दरम्यान, नवज्योत कौर सिद्धू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी आलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. रावणदहनाचा कार्यक्रम शांततेत संपल्यानंतर मी रवाना झाले होते. मात्र काही वेळातच मला या दुर्घटनेबाबत समजले. त्यानंतर मी रुग्णालयात धाव घेतली. आता मी जखमींची सोबत करण्यासाठी रुग्णालयातच राहणार आहे, असे सिद्धू यांनी सांगितले. 



 

Web Title: Amritsar Train Accident : Navjot Singh Sidhu's wife was the chief guest at the celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.