बाबो! आधार कार्ड दाखवा आणि लग्नात जेवा; पाहुण्यांना पाहून वधू पक्षाने ठेवली भलतीच अट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:51 PM2022-09-26T12:51:10+5:302022-09-26T13:07:58+5:30
वधूपक्षाने दारात आलेल्या वऱ्हाड्यांना चक्क आधार कार्ड दाखविण्याची मागणी केली.
लग्न म्हटलं की भन्नाट किस्से हे आलेच. अमरोहा जिल्ह्यात एक अजब-गजब घटना समोर आली आहे. लग्नासाठी आलेले पाहुणेमंडळी पाहून कुटुंबीयांच्या नाकीनऊ आले. यानंतर लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाने अनोखी शक्कल लढवली. वधू पक्षाने दारात आलेल्या वऱ्हाड्यांना चक्क आधार कार्ड दाखविण्याची मागणी केली. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनाच फक्त लग्नमंडपात एन्ट्री देण्यात आली आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं, अशा लोकांना परत पाठवण्यात आल्याची विचित्र घटना घडली आहे.
लग्नासाठी आलेली मंडळी यामुळे चांगलीच संतापली. त्यांनी या घटनेचा एक व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केला आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हसनपूर भागातील नवरीकडे वर पक्ष पोहोचला होता. वधू पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जितकी पाहुण्यांची संख्या होती, त्याहून खूप जास्त लोकं लग्नाला आले होते.
वधू पक्षाने जेव्हा मोठ्या संख्येने आलेले लोक पाहिले तर त्यांना मोठा धक्काच बसला. वर पक्षाने जितके संख्या सांगितली होती, त्यानुसार जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र पाहुण्यांची इतकी मोठी संख्या पाहून वधू पक्षाचे लोक घाबरले. त्यानंतर आधार कार्डाच्या आधारावर लग्न मंडळपात एन्ट्री देणार असल्याचं ठरवण्यात आलं.
ज्या लोकांकडे आधार कार्ड होतं, केवळ त्यांनाच फक्त लग्नमंडपात एन्ट्री देण्यात आली. त्या दिवशी गावात दोन लग्न होती. जेव्हा एका लग्नात जेवण सुरू झालं तर दुसऱ्या लग्नात आलेले लोक देखील पहिल्या लग्नात जेवणासाठी धावले अशी माहिती नंतर समोर आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.