'त्या चीनविरोधी जाहिरातीमुळे ट्विटरकडून अमूलचं हँडल ब्लॉक?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:36 PM2020-06-06T18:36:53+5:302020-06-06T19:26:33+5:30
अमूलनं ट्विटरवरील पोस्टमध्ये एक्झिट द ड्रॅगन नावाचं एक व्यंगचित्र शेअर केलं होतं.
नवी दिल्लीः भारताची सर्वात मोठी डेअरी फार्म आणि दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलचं ट्विटर अकाउंट Boycott Chinese Products मोहिमेवरील जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर ब्लॉक झाल्यानं एकच खळबळ उडाली. अमूलने ट्विटरवर एका कार्टूनचे पोस्टर शेअर केले होते, ज्यात चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं ट्विट अकाऊंटच ब्लॉक करण्यात आलं. अमूलनं ट्विटरवरील पोस्टमध्ये एक्झिट द ड्रॅगन नावाचं एक व्यंगचित्र शेअर केलं होतं.
या व्यंगचित्रात ड्रॅगनशी लढून अमूल गर्ल आपला देश वाचवताना दाखवण्यात आली आहे. चिनी कंपनी असलेल्या टिकटॉकचा लोगोही या व्यंगचित्रात पाहायला मिळतोय. तसेच या व्यंगचित्रात अमूल 'मेड इन इंडिया' ब्रँड असल्याचे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. त्यांचा उद्देश पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देण्याचा आहे. काही काळानंतर ट्विटरनं हे ब्लॉक केलेलं खाते पुन्हा सक्रिय केले आले.
#Amul Topical: About the boycott of Chinese products... pic.twitter.com/ZITa0tOb1h
— Amul.coop (@Amul_Coop) June 3, 2020
दुसरीकडे अमूलचे खाते बंद झाल्याच्या बातमीनंतर ट्विटरने आपले स्पष्टीकरण दिले आहे. ट्विटरने सांगितले की, चीनविषयी ट्विट करण्यात आलेल्या पोस्टमुळे नव्हे, तर खात्याच्या सुरक्षेसाठी अमूलवर ही कारवाई करण्यात आली. अमूलच्या ट्विटर अकाऊंटला कधीही ब्लॉक केलेले नव्हते, फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी ते सस्पेंड केलं होतं. ट्विटर यूजर्स अद्वैत काला यांनी ट्विट केले की, ट्विटरने ही निष्ठा अशा देशासाठी दाखवली आहे. ज्यांनी ट्विटरवरच निर्बंध लादलेले आहेत. अमूल हा भारतीय ब्रँड असून, त्याचा अभिमान आहे.
Dear Twitter,
— Deepak Uppal (@DeepakU24521389) June 6, 2020
You were not a party in this. Why did you take sides unnecessarily.
If Indians can start an Exit the Dragon movement, then an exit the Twitter movement can also be started.
Please retweet.
Let's see how many they can block. #Amul#amulpic.twitter.com/IDbr6yleIc
हेही वाचा
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या
सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...
चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन
गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल
Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी
पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार
...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख