अमुलच्या कार्यालयाची तोडफोड
By admin | Published: June 10, 2014 08:27 PM2014-06-10T20:27:46+5:302014-06-10T20:27:46+5:30
दुध उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अमुल या सहकारी संस्थेच्या कार्यालया समोर दुपारी शेतक-यांनी निदर्शने केली होती.
ऑनलाइन टीम
सुरत(गुजरात), दि. १० - दुध उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अमुल या सहकारी संस्थेच्या कार्यालया समोर दुपारी शेतक-यांनी निदर्शने केली होती. मालाची किंमत १४ टक्क्यांनी वाढवून देण्यात यावी म्हणून शेतक-यांनी निदर्शने केली होती. या निदर्शनाला हिंसकवळण लागले असून निदर्शनकर्त्यांनी अमुलच्या कार्यालयात प्रवेश करत कार्यालयाची तोडफोड केली. अमुलचे मालकी हक्क असलेली गुजरात को ऑपरेटीव मिल्क मार्केटिंग फेडरेशन चे सीइओ आर.एस. सोढी यांनी सांगितले की दुध विक्रेत्यांना मालाची किंमत वाढवून हवी असल्याचे सांगितले. तर, एमडी. डि.के. रत्नम यांनी दिलेल्या माहितीनुसार निदर्शनकर्त्यांच्या मागण्या लेखी स्वरुपात स्विकारल्या नंतरही त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली, ज्यामुळे पोलिसांना घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळावी लागली.