प्राध्यापकाने शिक्षिकेला खोलीत बंद करून ठेवले अनैसर्गिक शारीरिक संबंध; पीडितेचा आरोप, FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:04 PM2023-01-31T18:04:44+5:302023-01-31T18:05:48+5:30
कॉलेजचे अतिरिक्त लेक्चर घेणाऱ्या शिक्षिकेने प्राध्यापकावर गंभीर आरोप केला आहे.
नवी दिल्ली : हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील आदमपूर भागातील एका कॉलेजचे अतिरिक्त लेक्चर घेणाऱ्या शिक्षिकेने तिच्या कॉलेजच्या प्राध्यापकावर तिला एका खोलीत बंद करून तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. पीडितेचा आरोप आहे की, संबंधित प्राध्यापकाने तिला धमकावले की. जर तिने त्याचे ऐकले नाही तर ती कॉलेजमध्ये नोकरी करू शकणार नाही. याप्रकरणी पीडितेने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, पीडित शिक्षिका कॉलेजमध्ये हिंदी विषयाचा अतिरिक्त क्लास घेते असे तक्रारीत नमूद आहे. 3 ऑक्टोबर 2017 पासून ती या कॉलेजमध्ये कार्यरत आहे. 24 जानेवारी रोजी महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना ती संध्याकाळच्या ड्युटीवर होती. परीक्षेची वेळ 2 ते 5 अशी होती. परीक्षेनंतर तिने उत्तरपत्रिका जमा करण्यास सुरुवात केली तेव्हा भूगोलाचे प्राध्यापक अशोक बैनीवाल हे हजेरी मशीनजवळ उभे होते.
धमकी देऊन केला विनयभंग
तिथे प्राध्यापकाने सांगितले की, त्याला शिक्षिकेशी ड्युटीशी संबंधित काहीतरी बोलायचे आहे. तो 48 क्रमांकाच्या खोलीत गेला. तिथे गेल्यावर तिला एकटी पाहून त्याने दरवाजा आतून लावला. त्याला विरोध केला असता, काम करायचे असेल तर ते सांगेल ते करावे लागेल असे प्राध्यापकाने म्हटले, असा आरोप पीडितेने केला.
प्राध्यापकावर गुन्हा दाखल
पीडित महिलेचा आरोप आहे की, तिथे आरोपी प्राध्यापकाने तिचा विनयभंग केला आणि जबरदस्तीने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. याआधीही आरोपीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे. तिला वारंवार आरोपीने एकांतात भेटण्यासाठी बोलावले आणि तिने नकार दिला असता, तिला कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी धमकी त्याने दिली. या घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्याचे पीडितेने सांगितले. ती अनुसूचित जातीची आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध एससी-एसटी कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"